Google Ad
Editor Choice india

Delhi : काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुखद निधन!

महाराष्ट्र 14 न्यूज : काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. काँग्रेसचे आक्रमक प्रवक्ते म्हणून राजीव त्यागी यांची ओळख होती. टिव्हीवरील चर्चासत्रांमध्ये ते नेहमीच काँग्रेसची भूमिका भक्कमपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध होते.
राजीव त्यागी यांच्या निधनानंतर काँग्रेसने ट्वीट करुन दुःख व्यक्त केले. ‘राजीव त्यागी यांच्या आकस्मिक निधनाने मोठं दुःख झालं, ते एक कट्टर काँग्रेसी आणि एक सच्चा देशभक्त होते.”

राजीव त्यागी यांचा जन्म २० जून १९७० साली झाला आहे. राजीव त्यागी यांचे ट्वीटर हँडल पाहिले तर आज सायंकाळपर्यंत ते एकदम व्यवस्थित होते. त्यांनी सायंकाळी ३ वाजून ४१ मिनटाला ट्वीट करुन माहिती दिली होती, की सायंकाळी ५ वाजता एका चॅनेलच्या डिबेटमध्ये सहभागी होणार आहे. या डिबेटमध्ये त्यागी सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. तत्काळ त्यांना गाजियाबाद येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. जेथे त्यांना मृत घोषित केले.

Google Ad

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!