Google Ad
Uncategorized

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये तसेच तक्रारींचा वेळीच निपटारा व्हावा यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात दर शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सर्व अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १८ पोलीस ठाणे आहेत. पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची हद्द मोठी आहे. पिंपरी-चिंचवड, चाकण, खेड-आळंदीसह तळेगाव दाभाडे हा औद्योगिक परिसर आयुक्तालयाच्या हद्दीत येतो. अनेकदा नागरिकांकडून येणाऱ्या अर्जावर काहीतरी कार्यवाही करण्यात येत असते. तर, काहीवेळेस यात थोडीफार दिरंगाई होऊ शकते. तक्रार निवारण दिनानिमित्त नागरिकांना तक्रारीवर झालेल्या कार्यवाही माहिती दिली जाईल. तसेच नागरिकांना आपल्या तक्रारी मांडता येतील. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी आयुक्तालयामार्फत विविध माध्यमांद्वारे तक्रारी स्वीकारल्या जातात.

Google Ad

यामध्ये संकेतस्थळ, व्हॉट्सअॅप, ई-मेल तसेच प्रत्यक्षरित्या पोलीस आयुक्त कार्यालय, उपायुक्त कार्यालय, सहायक पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस ठाणे यांचा समावेश आहे. तसेच शासन आणि वरिष्ठ कार्यालयांकडून वेगवेगळ्या प्रकारचे तक्रार अर्ज प्राप्त होत असतात. या प्राप्त तक्रार अर्जांची मुदतीत व उचित कार्यवाही करून त्याचे निराकरण करणे अपेक्षित आहे. तक्रार अर्जाची वेळेत कार्यवाही न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!