Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड पोलीस दलातील उल्लेखनिय कामगिरी केलेल्या ८ महिला पोलीस अंमलदारांचा स्मार्ट ई – बाईक देवून गौरव

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ ऑक्टोबर) : आज दिनांक १७.१०.२०२२ रोजी पोलीस मुख्यालय , निगडी येथे दुव गृप व टाईम्स गृप यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड पोलीस दलात उल्लेखनिय कामगिरी केल्या बद्दल ८ महिला पोलीस अंमलदार यांना मा . श्री . अंकुश शिंदे पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड याचे हस्ते स्मार्ट ई – बाईक वाटपाचे आयोजन करण्यात आले . 

दिनांक १७ / ० ९ / २०२२ या मध्ये १ श्रीमती . एम . आर . गायकवाड ( महिला सहायक पोलीस फौजदार ) नेमणूक निगडी पोलीस ठाणे यांनी उत्कृष्ठ तपास व एन.डी.पी.एस अॅक्ट अंतर्गत १,४०,५६६ / – रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे . २ श्रीमती सुवर्णा थेउरकर ( महिला सहायक पोलीस फौजदार ) नेमणूक भोसरी वाहतुक विभाग यांनी उत्कृष्ठ वाहतुक नियोजन व नियमन करून उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे . ३. श्रीमती . ए.पी. बोरकर ( महिला पोलीस हवालदार ) नेमणूक भोसरी पोलीस ठाणे यांनी कोव्हीड १ ९ च्या कालावधीत जीवाची पर्वा न करता उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे .

Google Ad

४. श्रीमती तनुजा चौधरी ( महिला पोलीस हवालदार ) नेमणूक वाकड पोलीस ठाणे यांनी सी.सी.टी. एन . एस या कार्यप्रणालीवर सर्व गुन्ह्यांची माहिती वेळेत अद्ययावत करून उत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे . ५ . श्रीमती शालिनी चचकल ( महिला पोलीस हवालदार ) नेमणूक हिंजवडी पोलीस ठाणे यांनी जनतेशी सौहार्दपूर्ण जनसंवाद आणि मिसींग व्यक्ती तसेच महिला विषयक तक्रारींचे निरसन करुन उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे . ६. श्रीमती सुरेखा देशमुख ( महिला पोलीस हवालदार ) नेमणूक मुख्यालय यानी कोव्हीड १ ९ च्या कालावधीत जीवाची पर्वा न करता उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे .

७. श्रीमती कविता धोंडगे ( महिला पोलीस नाईक ) नेमणूक देहुरोड पोलीस ठाणे यांनी सन २०२२ मधील जगत्गुरु श्री . संत तुकाराम महाराज पालखी सोहळयामध्ये गर्दीचा फायदा घेवून पाकीट चोरी करणारे व चैन चोरी करणारे आरोपी निष्पन्न करुन उत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे . ८. श्रीमती . काचन पंडीत ( महिला पोलीस नाईक ) नेमणूक दिघी पोलीस ठाणे यांनी सन २०२२ मधील सतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी बंदोबस्तचे उत्कृष्ठ नियोजन तसेच पासपोर्ट व चारित्र्य पडताळणी प्रकरणे संपूर्ण निर्गती करुन उत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे .

Fill Form व गृप व टाईम्स ग्रुप यांनी महिला पोलीसांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची दखल घेवून त्यांना स्मार्ट ई – बाईक देवून त्यांच्या कार्याचा गौरव केल्याबद्दल आयोजकांचे व संपूर्ण टीमचे मा . श्री . अंकुश शिंदे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी आभार व्यक्त करून उल्लेखनिय कामगिरी करणा – या सर्व महिला पोलीस अंमलदारांना समाजामध्ये अधिक उत्कृष्ट कर्तव्य बजावून पोलीस दलाचे नाव उज्वल करावे असे गौरवोद्गार करत मार्गदर्शन करुन पुढील कर्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या . सदर कार्यक्रमास मा . श्री . अंकुश शिंदे पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड यांचेसह श्री . काकासाहेब डोळे पोलीस उप – आयुक्त मुख्यालय , श्री . सतीश माने सहायक पोलीस आयुक्त , प्रशासन श्री . रावसाहेब जाधव वरिष्ठ पोलीस • निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी तसेच श्री . रतनदीप रे मुख्य व्यवस्थापक / द्रुव सॉफ्टवेअर कंपनी व संपुर्ण टीम आदी मान्यवर उपस्थित होते .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!