महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ ऑगस्ट) : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना काल शिवसेनेनं मोठी घोषणा केली आहे. आता शिवसेना संभाजी ब्रिगेड या संघटनेसोबत युती केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी याबाबत घोषणा केली. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र मैदानात उतरणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आले. दि.२६ रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना व संभाजी ब्रिगेड यांची युती झाल्यामुळे पिंपरी युवा सेनेच्या वतीने व संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना पेढे भरूवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
या वेळेस पिंपरी युवा सेनेचे युवा अधिकारी श्री. निलेश हाके, संभाजी ब्रिगेडचे मावळ लोकसभा कार्याध्यक्ष श्री. दिनकर केदारी, संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा संघटक श्री. हनुमंत गुरव, व्यापारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. आदमभाई तांबोळी, सफाई कामगार संघटनेचे संघटक श्री. संतोष सूर्यवंशी , आघाडी संघटक श्री. अंकुश हाके, मनोज काची, श्री. महेंद्र ओव्हाळ, श्री. तुषार साठे, श्री. अजय शिंदे, श्री शांतू कोळी, श्री बंदू मुल्ला, चिंचपा निन्गडॊळे, युवा सैनिक, शिवसैनिक व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.