Google Ad
Editor Choice

जिल्हा रूग्णालय पुणे व ॲाडी पुणे कार्यशाळा हिंजवडी यांचे संयुक्त विधमाने … आरोग्य जनजागृती व रक्तदाब शिबीराचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ऑगस्ट) : जिल्हा रूग्णालय पुणे व ॲाडी पुणे कार्यशाळा हिंजवडी यांचे संयुक्त विधमाने दि २६/८/२०२२ रोजी आरोग्य जनजागृती व रक्तदाब शिबीराचे आयोजन करणेत आले होते सदर शिबीराचे ऊद्घाटन डॅा प्रकाश रोकडे जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक फिरते नेत्र पथक पुणे यांचे हस्ते करणेत आले. सदर शिबिरात मिलिंद कारंजकर स्यकोलॅाजिस्ट यांनी मानसिक आरोग्य तसेच नंदू सातपुते समुपदेशक यांनी ताणतणाव व्यावस्थापन , मोहिनी भोसले सामाजिक कार्यकर्ती यांनी तंबाकु सेवन दुष्परिणाम व तंबाकुमुक्ती संबंधी मार्गदर्शन केले.

सिमा हगवणे समुपदेशक नेत्र यांनी नेत्रदानाचे महत्व व नेत्रदान संकल्प याची माहिती देऊन नेत्रदान संकल्प फॅार्म भरून घेतले तसेच डॅा निशा तेली रक्त संक्रमण अधिकारी व टीम यांनी एकुण ३७ बाटली रक्तदान संकलित केल्या. सदर शिबीराचे यशस्वीरित्या आयोजन करणेकामी डॅा प्रकाश रोकडे व त्याचे सहकारी जिल्हा रूग्णालय पुणे व श्री संभाजी विकास मुंढे – प्रशासक श्री आकाश मच्छिंद्रनाथ अंभोरे – व्यवस्थापक व सहकारी अॅाडी पुणे कार्यशाळा यांनी विशेष प्रयत्न केले .

Google Ad

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!