Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवडला मिळणार भाजपच्या रुपाने आणखी एक आमदार … या भाजपच्या अत्यंत आक्रमक नेत्या आता होणार आमदार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ जून) : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर झाली असून त्यात पंकजा मुंडे यांना डच्चू देण्यात आला आहे. भाजपने नुकतीच पाच अधिकृत उमेदवारांची नावं घोषित केली आहेत.

राज्यातील 10 विधान परिषदेच्यान निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत भाजप पाच जागा लढवणार आहे. उमा खापरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय यांना भाजपने विधान परिषदेची संधी दिली आहे.

Google Ad

प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना भाजपने दुसऱ्यांदा विधान परिषदेची संधी दिली आहे. तर राम शिंदे हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार आहे. उमा खापरे (uma khapre) आणि श्रीकांत भारतीय या दोन नव्या चेहऱ्यांनाही भाजपने विधान परिषदेची संधी दिली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना विधान परिषदेसाठी संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, या दोन्ही नेत्यांना भाजपने संधी नाकारली आहे. तर, मित्र पक्षाचे नेते विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांचाही विधान परिषदेतील पत्ता कट करण्यात आला आहे. बड्या नेत्यांना डावलत भाजपने उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना संधी दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

उमा खापरे या भाजपच्या अत्यंत आक्रमक नेत्या आहेत. त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी भाजपमध्ये महिला मोर्चा प्रदेश सचिवपदासह संघटनेत विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. भाजपमधील जुन्या नेत्या म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणूनही ओळखल्या जातात.उमा खापरे या पिंपरी-चिंचवडच्या आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेविका म्हणून चांगले काम केलं आहे. सलग दोनवेळा त्यांनी नगरसेविका म्हणून काम केलं आहे. 2001-2002 मध्ये त्या पिंपरी चिंचवड पालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या.

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!