महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : झुंज दिव्यांग संस्था व एकता मित्र मंडळ निगडी यांच्या सहकार्याने संस्थेच्या 130 दिव्यांग बांधवांना पंढरपूर व अक्कलकोट विनामूल्य देव दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती.दि14/05/2022 ते 15/05/2022 सकाळी नऊ वाजेपर्यंत परत चिखली घरकुल येथे सर्व व्यवस्थितपणे सुखरूप आले.
या सहलीला राहुल भाऊ येवले व गणेश शेठ बाफना त्यांचे दोन वर्षापासून सहलीचे आयोजन करत आहेत. सहलीमध्ये दोन टाईम चे जेवण नाश्ता पूर्णपणे दिल्या जातो. कुठल्याही दिव्यांग बांधवा कडन शुल्क आकारण्यात येत नाही. अशाप्रकारे दिव्यांग बांधव सहलीचा भरभरून आनंद घेतात. हे आपल्या सहलीचे दुसरे वर्ष आहे.
एकता मित्र मंडळ निगडी व राहुल भाऊ येवले गणेश शेठ बाफना आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र मंडळ सर्वांचे झुंज दिव्यांग संस्था व प्रशिक्षण केंद्र व झुंज अध्यक्षा राजू हिरवे, राजेश दिवटे, दादासाहेब काशीद, ओममंलग घोणे यांचे सहकार्य लाभले.