Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरवमधील जिजामाता उद्यानातील … सुरेल दिवाळी पहाट ठरली रसिकांसाठी सुरेल गाण्याची मैजवानी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ नोव्हेंबर) : अंगणात आकर्षक रांगोळी, आकाश कंदील, दिव्यांची रोषणाई व सोबत फराळाचा आस्वाद घेत दिवाळी सण आला. या उत्सव काळात आमदार ‘लक्ष्मण पांडुरंग जगताप’ यांच्या संकल्पनेतून आणि उद्योजक शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप कला क्रीडा अकॅडमी आणि राही माई प्रतिष्ठाण च्या वतीने पिंपळे गुरव मधील राजमाता जिजाऊ उद्यानात मंगळवार ०२नोव्हेंबर ते ०४ नोव्हेंबर पहाटे ०६.०० वाजता पिंपरी चिंचवडवासीयांना ‘दिवाळी पहाट’ च्या माध्यमातून विविध खमंग कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या कार्यक्रमाचे दिमाखदार उद्घाटन महापौर माई ढोरे आणि जयश्रीताई जगताप तसेच सर्व स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Google Ad

कोरोनाच्या संसर्गाचे नियम शिथिल झाल्याने आता विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची दिवाळी पहाटच्या निमित्ताने शहरात रेलचेल सुरू झाली आहे. संगीत मैफल, नृत्य सादरीकरण अशी भरगच्च मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळत आहे. यावेळी आयुष्यावर बोलू काही या सलील कुलकर्णी, संदीप खरे यांच्या पावसातल्या सरी, अगोबाई ढगोबाई अशा सुरेल गाण्याने मैफिलीत रंगत आणली. कोरोनाच्या संकट काळात जवळजवळ दीड वर्ष घरात बसून निमूटपणे गाणी ऐकणाऱ्या रसिकांना प्रत्यक्षात संगीतमय गाण्यांचा मनमुरादपणे आनंद घेता आला.

🏮दिवाळी पहाट’चे पुनरागमन

दोन वर्षानंतर ‘दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमांना परवानगी मिळाल्याने दिग्गज कलाकारांची मांदियाळी सादरीकरणासाठी सज्ज झाली आहे.
कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे गेल्या वर्षी ‘दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमांचे आयोजन झाले नव्हते. मात्र, यंदा निर्बंध शिथिल झाल्याने दिवाळीचे पाचही दिवस वैविध्यपूर्ण कार्यक्रम रसिकांच्या भेटीला येणार आहेत. अनेक दिग्गज कलाकारही या निमित्ताने सादरीकरण करणार आहेत.

🏮स्वर पहाट
सादरकर्ते :- प्रथमेश लगाटे सुप्रसिद्ध गायक ( सा रे ग म प लिटिल चॅम्प झी मराठी )
विनल देशमुख, श्रावनी महाजन सुप्रसिद्ध गायक ( विजेता भी हो सुनसार स्टार प्रवाह ( सुप्रसिद्ध नायिका ) रुपाली घोगरे ( सुप्रसिद्ध गायिका )
बुधवार दि . ०३/११/२०२१ रोजी पहाटे ५.३० ते ८.०० पर्यंत

🏮स्वर बहार
सादरकर्ते :- नितीन कदम ( सुप्रसिद्ध गायक )
रोहिणी पांचाळ ( घोड़ेकर ) ( सुप्रसिद्ध गायिका ) अमोल देशमुख ( सुप्रसिद्ध गायक )
गुरुवार दि . ०४/११/२०२१ रोजी पहाटे ५.३० ते ८.०० पर्यंत

यावेळी मा.नगरसेवक शंकरशेठ जगताप यांनी आलेल्या कलाकारांचा सत्कार करून उपस्थित रसिकांचे आभार मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!