Google Ad
Editor Choice Pune District

आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू प्रकरणी … मुळशीचे भूमीपूत्र प्रवीण तरडे म्हणाले, आता कंपन्यांत घुसू…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९जून) : पुण्याच्या मुळशी येथील उरवडे औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडली. उरवड्यातल्या क्लोरिफाईड कंपनीत लागलेल्या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या कंपनीत ही आग लागली. मंगळवारी घटनास्थळी प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी यांनी भेट दिली. यावेळी तरडे चांगलेच संतापले होते. आपले भाऊ बहिण कुठे आणि कशा अवस्थेत काय करतात, याची पाहणी आणि चौकशी आपण केलीच पाहिजे. मुळशी तालुक्याची रग दाखवून देऊ, कंपन्यांत घुसून पाहणी करु, अशा शब्दात तरडे यांनी आपला संताप व्यक्त केला.

इथं तक्रार कोणाचीचं नाही, आपल्या सगळ्यांवर आता एक जबाबदारी आहे. शासन आणि प्रशासनावर अवलंबून राहू नका. आपलं कुणीतरी कंपनीत काम करतंय ना? चला मग आपल्याला आतमध्ये कंपनीत जायचंय. आपण आपली तालुक्याची रग कुठंही दाखवतो ना? दहा ठिकाणी आपली रग माहिती आहे…. तर आता आपली रग आपल्या आई-बापांसाठी दाखवा, असं प्रवीण तरडे म्हणाले.

Google Ad

प्रवीण तरडे हे मूळचे मुळशीचेच… ते तिथले भूमीपूत्र… वयाच्या विसाव्या बावीसाव्या वर्षी त्यांनी काही वर्षे तेथील कंपन्यांत काम केलंय. त्यांना तेथील परिस्थितीची जाणीव आहे. हीच गोष्ट त्यांनी मंगळवारी बोलून दाखवली. मी इथल्याच शेजारच्याच कंपनीत जवळपास दोन ते तीन वर्ष काम केलंय. मला इथली परिस्थिती माहिती आहे. आपले आय-बाप, बहीण भाऊ असेच महिन्या-वर्षांनी जळणार, आणि आपण हाच तमाशा पाहत बसायचं का? असा सवाल त्यांनी विचारला…

मी इथल्या सगळ्या सरपंच आणि उपसरपंच यांना विनंती करतो की आता आपले भाऊ बहीण- आई बाप, आपले नातलग जिथं कुठे काम करत अशतील तिथे आपण जाऊ, त्यांना विनंती करु, की आमची जवळची माणसं कुठं काम करतात, हे आम्हाला पाहू द्या. त्यांनी नाही ऐकलं तर आपण कंपन्यांत घुसू… पण ते कुठल्या परिस्थितीत काम करतात, हे आपल्याला पहावंच लागेल…. नाहीतर वर्षानुवर्षे आणि महिन्यांनोमहिने असा तमाशा बघण्याची आपल्यावर वेळ येईल…

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!