Google Ad
Editor Choice

Delhi : आता थेट लसीकरण … नोंदणीची गरज नाही ; पण, वाचा नवे नियम काय सांगतात

महाराष्ट्र 14 न्यूज : आता 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लस घेण्यासाठी नोंदणी करण्याची गरज नाही. थेट लसीकरण केंद्रावर जाऊन या गटातील व्यक्तिंना लस घेता येणार आहे. त्यामुळे कोविन अॅपवर नाव नोंदणी करून अपॉईंटमेट घेण्याच्या कटकटीतून सुटका होणार आहे. केंद्र सरकारने नवे नियम जारी केले असून त्यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

18 ते 44 वयोगटातील व्यक्तिंना लसीकरणासाठी ऑनसाईट रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. आता 18 ते 44 वयोगटातील व्यक्ती थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. दरम्यान, त्यांना http://Cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.

Google Ad

रोज लस देण्याची वेळ संपेल आणि शेवटी ज्या लस उपलब्ध राहतील त्या ऑनसाईट व्यवस्थेनुसार लोकांना दिल्या जातील. त्यामुळे लस वाया जाणार नाहीत. त्याचा उल्लेख कोविन प्लॅटफॉर्मवर केला जाणार आहे. ही नवीन सुविधा केवळ व्हॅक्सिनेशन सेंटरवरच असेल. अनेकदा व्हॅक्सिनचा स्लॉट बुक केल्यानंतरही अनेक लोक व्हॅक्सिन घेण्यासाठी सेंटरवर येत नाही. त्यामुळे लस वाया जात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!