Google Ad
Editor Choice Maharashtra

पिंपळे गुरव मधील रामनगर-मयूर नगरी जवळ एमएनजीएल च्या गलथान कारभारामुळे आग लागून चार गाड्या जळून खाक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ११ मे) : पिंपळे गुरव मधील काटे पुरम चौका लगत मयुरी नगरी येथील रामनगर येथे एम.एन.जी.एल चे कामकाज सुरू असताना दुपारी तिनच्या सुमारास गॅस पाईपलाईन मधून गळती झाल्यामुळे भर दुपारी आग लागली. सुरुवातीला खूप थोड्या प्रमाणात असणाऱ्या आगीने उग्र रूप धारण करून चारचाकी वाहना विळखा घेतला यात ही वाहने पूर्णपणे जळून खाक झाली.

आगीच्या ज्वाला सुमारे २० ते २५ फूट असल्याने परिसरातले नागरिक भयभीत झाले होते. सुदैवाने कुठलीही जीवीतहनी झाली नाही. मात्र जवळ असणाऱ्या झाडांना मात्र याची झळ लागली. याप्रसंगी रहाटणी येथील अग्निशामक दलाच्या बंबाने त्वरित दाखल झाल्या मुळे मोठी हानी टळली. या पाठोपाठ वल्लभ नगर येथील अग्निशामक दलाचे दोन वाहने त्वरित उपस्थित झाली.

Google Ad

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शना खाली येथील पाहणी व परिसरात जमलेल्या नागरिकांना दूर करण्याचे प्रयत्न करताना दिसून आले. रस्त्याच्याकडेला ९ ते १० चारचाकी वाहने पार्क केली होती. यातील 4 चारचाकी वाहने जळून खाक झाली.

एम एन जी एल अधिकारी माणिक कदम यांनी सांगितलेल्या माहितीनुसार गॅस पाईप लाईन ला लिकेज झाल्यामुळे पाईपलाईन मधून गॅस बाहेर पडल्यामुळे उन्हाच्या तडाखा असल्याने त्याने पेट घेतला.

एम.एन.जी.एल कर्मचाऱ्यांनी रस्ता खोदकाम करण्यासाठी कुठलीही महापालिकेची परवानगी न घेता खोदकाम केले.खोदकाम करताना एम.एन.जी.एल ची पाईप फुटून गॅस गळती झाल्याने ही आग लागली असे प्रथम दर्शनी पाहावयास मिळाले असे अग्निशामक दलाचे सब ऑफिसर ऋषिकांत चिपाडे यांनी माहिती दिली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!