Google Ad
Editor Choice

अनाथ बालकांच्या चेहऱ्यावर दिवाळी सणाचा आनंद फुलविण्या करीता … नवी सांगवीतील सु-प्रभात ग्रुप च्या वतीने ७० विद्यार्थ्यांना दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंचे वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० ऑक्टोबर) : “हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती” या ओळी प्रमाणे अनेक पोरक्या लेकरांच्या डोक्यावरचे मायेचं छत्र धरणाऱ्या वैशाली विलास पंदारे यांनी चालवलेल्या घोडेगाव येथील पळसटीका येथील बालगृह अनाथ , निराधार मुलांचे संगोपन केंद्र या ठिकाणी बालकांच्या चेहऱ्यावर दिवाळी सणाचा आनंद फुलविण्या करीता त्यांना दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंचे वाटप नवी सांगवी येतील सु-प्रभात ग्रुप च्या वतीने ७० विद्यार्थ्यांना करण्यात आले.

Google Ad

यावेळी गणेश सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेशदादा तावरे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ.देवीदास शेलार, महाराष्ट्र राज्य शूटिंग बॉल संघटनेचे पंच भाऊसाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र गायके, संदीपान सामसे तसेच बालगृहाचे संस्थापक विलास पंदारे आणि वैशाली पंदारे उपस्थित होते.

अगदी शासनाच्या कुठल्याही अनुदानाशिवाय हे बालगृह आज अनेक निराधार लेकरांचे हक्काचे घर बनले आहे. सध्या या वसतिगृहात ७० मुले राहतात. मुलांसाठी बाग, वाचनालय, मुलांसाठी गरम पाण्याची सुविधा, जेवणाची उत्तम सोय, योग-प्राणायम, कराटे प्रशिक्षण, अभ्यासाचे योग्य नियोजन आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मुलावर केले जाणारे संस्कार हे सर्वच अगदी अभिनंदनीय आहे. विशेष म्हणजे पंदारे कुटुंब आणि ही मुले अगदी एकत्र राहतात. सर्वांचा स्वयंपाक एकत्र किचनमध्येच होतो एवढ त्यागी कार्य क्वचितच पाहायला मिळते. लेकरांना वेगळे न ठेवता सर्वजण एकत्र राहतात, अगदी गुण्यागोविंदाने.

‘बालगृह हे एक आदर्श कुटुंब आहे. या कुटुंबाला आजपर्यंत अनेक दिग्गजांनी भेटी दिल्या आहेत. दोघांच्या कार्याचे कौतुकही केले आहे. वैशालीताईंना आजपर्यंत अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. लोकसहभागातून चालवले जाणारे बालगृह हे आदर्शवत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!