Google Ad
Editor Choice

पुण्यातील राजाराम पूल ते फन टाइम थिएटरपर्यंतचा मार्ग होणार सुसाट … 2.6 किलोमीटरचा उड्डाणपूल उभारणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ सप्टेंबर) : पुण्यात अजून एक उड्डापूल उभारण्यात येणार असून, तो सिंहगड रस्त्यावरील राजारामपूल ते फन टाइम थिएटरपर्यंत बांधला जाणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

वाहतूक कोंडीमुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. सिंहगड परिसरातील या कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी शहरात अजून एक उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे, अशी माहिती महापौरांनी दिली. मोहोळ म्हणाले की, राजाराम पूल ते फन टाइम थिएटर पर्यंत हा उड्डाणपूल असेल. या उड्डाणपुलाची लांबी 2.6 किलोमीटर राहणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकर यांच्या हस्ते 24 सप्टेंबर रोजी या कामाचे भूमिपूजन होणार असून, यावेळी पालकमंत्री अजित पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित राहणार आहेत.

Google Ad

पुण्याची परिस्थितीही दिल्ली आणि मुंबईसारखी होत चालली आहे. पुणे अवाढव्य वाढले आहे. येणाऱ्या त्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सशक्त राहिली नाही किंवा तिचा वापर नागरिकांनी केला नाही, तर वाहतूक कोंडीचे संकट भयंकर होणार आहे. याचा विचार करता आतापासूनच त्याचेन नियोजन करण्याची गरज आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

39 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!