Google Ad
Editor Choice

मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत रुग्णांना देण्यात येणाऱ्या निधीच्या वितरण प्रणालीतील त्रुटींबाबत … आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांचे उद्धव ठाकरेंना पत्र!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ सप्टेंबर) : मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत रुग्णांना देण्यात येणाऱ्या निधीच्या वितरण प्रणालीतील त्रुटींबाबत चिंचवड विधानसभेचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांनी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून आपल्या कार्यालयात आरोग्य कक्ष स्थापन केला आहे, त्याच्या माध्यमातून गरीब गरजू रुग्णांना उपचार आणि उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात येते. त्यांच्या कडे उपचारासाठी मदत मागण्या करीता अनेक नागरिक येत असतात, परंतु शासनाकडून काही नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्याचीच दखल घेत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून वास्तव मांडले आहे.

Google Ad

या पत्रात लक्ष्मण जगताप यांनी म्हटले आहे की, पुणे – पिंपरी चिंचवड येथे उपचाराकरिता दररोज अनेक रुग्ण दाखल होत असतात . शहरातील रुग्णालयात होणाऱ्या गंभीर आजारावरील उपचारासाठी लाखो रुपये रुग्णांना मोजावे लागतात , अशा रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष मुंबई येथे व विभागीय स्तरावर कार्यरत आहे . रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीकरिता आमदारांचे शिफारस पत्र देण्यात येते .

माझ्या कार्यालयातून आजपर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीकरिता नोव्हेंबर २०१ ९ पासून प्रकरणे दाखल करण्यात आलेले आहेत , त्या प्रत्येक प्रकरणाला मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून एकच उत्तर येते की संबंधित रुग्णालय धर्मादाय अंतर्गत रुग्णालय आहे व रुग्णाला पूर्णतः मोफत उपचार करावेत ‘ असे पत्र हॉस्पिटलच्या नावाने दिले जाते , अथवा मेलद्वारे मदतीसाठी पुणे जिल्हा समन्वयक यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले जाते . परंतु वस्तुस्थिती पाहता शहरातील धर्मादाय रुग्णालयामध्ये प्रत्यक्ष सदर पत्र घेऊन गेल्यानंतर रुग्णालयातून व पुणे जिल्हा समन्वयकाकडून संबंधित रुग्णाला उडवाउडवीची उत्तरं दिली जातात , आमचा फंड संपला आहे , आपल्या रुग्णाला आमच्याकडून उपचार मिळणार नाहीत असे सांगितले जाते . हि अतिशय गंभीर बाब आहे .

अशा परिस्थितीमध्ये त्या रुग्णाला आपल्या मुख्यमंत्री सहायता निधी मधून कोणतीही मदत होताना दिसत नाही . रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक व मानसिकदृष्ट्या पिळवणूक होत आहे , ही अतिशय गंभीर बाब आहे . ज्यावेळेस आपल्यामार्फत धर्मादाय अंतर्गत रुग्णालयांना पत्र देता त्यावेळेस आपण देखील आपल्या स्तरावरून हे निश्चित करणं गरजेचे आहे की सदर रुग्णालयामध्ये फंड शिल्लक आहे की नाही ?,

आपल्या मुख्यमंत्री सहायता निधी मधून देण्यात येणाऱ्या पत्राला देखील धर्मादाय रुग्णालयातील अधिकारी केराची टोपली दाखविली जाते . रुग्णांच्या नातेवाईकांकडून गंभीर आणि खर्चिक आजार असतील तरच मुख्यमंत्री सहायता निधीकडे मदतीसाठी धाव घेतली जाते . अशा परिस्थितीत जर असे उत्तर येणार असेल तर गोरगरीब रुग्णांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे ? सदर पत्राच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की , कोणताही रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहू नये , याकरिता आपल्याकडील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात आर्थिक मदतीसाठी दाखल होणाऱ्या प्रत्येक अर्जाचा सहानभूतीने विचार करून रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना योग्य ती आर्थिक सवलत देणेकामी आपल्या स्तरावरून सर्व धर्मादाय रुग्णालयांना आदेश निर्गमित करावे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

18 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!