Google Ad
Editor Choice

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन … महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ सप्टेंबर २०२१) : कोरोना विषयक नियमांचे काटेकोर पालन करून भारतीय स्वातंत्राच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिल्या.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणा-या विविध कार्यक्रमांचे नियोजन करणे संदर्भात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त कक्षामध्ये बैठक संपन्न झाली त्यावेळी त्या बोलत होत्या.

या बैठकीस आयुक्त राजेश पाटील, उपमहापौर नानी घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्य केशव घोळवे, शहर अभियंता राजन पाटील, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, मनोज सेठीया, प्रविण लडकत, उपआयुक्त सुभाष इंगळे, आशादेवी दुरगुडे, अजय चारठणकर, मुख्य माहिती व तंत्राद्यान अधिकारी नीळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे आदी उपस्थित होते.

Google Ad

केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार दि. १ ऑक्टोबर पासून ७५ तास विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांचा सहभाग घेवून विविध उपक्रम राबविण्याच्या सूचनाही महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिल्या.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!