Google Ad
Editor Choice Pune

Pune : मराठी रंगभूमी दिनानिमित्त राज्य सरकारने कलाकारांना दिला ऑक्सिजन

महाराष्ट्र 14 न्यूज : तब्बल आठ महिन्यानंतर राज्य सरकारने नाट्यगृहे व सिनेमागृह 50 % क्षमतेने सुरु करण्याची परवानगी दिल्याने कलाकारांमध्ये उत्साहाचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले व खुल्या कार्यक्रमांना लवकरच परवानगी मिळेल अशी आशा कलाकारांना वाटू लागली आहे.

Google Ad

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी नाट्यगृह खुले झाले या पार्श्वभूमीवर रंगमंदिराचे पूजन महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी तिसरी घंटा वाजवून केले.या प्रसंगी पुण्यक्तही कलेच्या घटकातील कलाकार मान्यवर उपस्थित होते.50 % क्षमतेने नाट्यगृहे सुरू झाले असता प्रेक्षकांची शासकीय नियमानुसार सुरक्षेची सर्व काळजी घेऊन प्रयोग करणार असल्याचे सांगितले ,जसे 50 % क्षमतेने नाट्यगृहे भाड्यामध्ये 50% सवलत प्रशासनाने द्यावी.व वर्तमान पत्राने देखील जाहिराती मध्ये 50%सवलत द्यावी अशी इच्छा कलाकारांनी व्यक्त केली.

तसेच नाट्यगृह प्रेक्षकांची गर्दी होण्यासाठी प्रेक्षजकांमध्ये जनजागृती करावी व शासनाने दिलेले नियम पाळून सर्व कार्यक्रम सादर व्हावे.असे मत मेघराजराजे भोसले आणि ऍड मंदारभाऊ जोशी (कायदेशीर सल्लागार अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ) यांनी याप्रसंगी व्यक्त केले. या वेळी अमर पुणेकर,अरुण गायकवाड,योगेश सुपेकर यांनी पारंपरिक गण गाऊन रंगभूमीला अभिवादन केले.या प्रसंगी अभिनेत्री रजनी भट, प्रमोद रनावरे, मनोज माझीरे, शशिकांत कोठावळे, फिरोज मुजावर, सोमनाथ खाटके, उमेश मोडक, अशोक जाधव, जितेंद्र वाईकर, शोभा कुलकर्णी, अर्चना कुबेर, उदय लागू, बाळासाहेब निकाळजे, विनायक कडवळे, कुमार पाटोळे, मिटू पवार, चंदू आयमाणे, कुमार गायकवाड आदी कलाकार उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!