महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज गुरुवार ( दि. ०७, जानेवारी २०२१ ) रोजी महानगरपालिका रुग्णालयात १५० बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील १४६ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ०४ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ९१ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०१ स्त्री- निगडी (४६ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील २६८ प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी ७ प्रवाशांचे नमुने NIV पुणे येथे UK स्ट्रेन करीता जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविले असता ०३ अहवाल नकारात्मक आढळले असुन ०३ अहवाल UK स्ट्रेन B.१.१.७ करीता सकारात्मक असून तिघांची प्रकृती चांगली आहे व ०१ अहवाल प्रलंबित आहेत.
पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा.
70 Comments