Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : ई – पास सुरुच राहणार की हद्दपार होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

महाराष्ट्र 14 न्यूज : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देशभरात ‘अनलॉक 4’च्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या गाईडलाईन्सही जारी होणार आहेत. याअंतर्गत ई-पासबाबत उद्या (३१ ऑगस्ट) राज्य सरकारची महत्त्वाची बैठक होणार आहे. ई-पास सुरुच राहणार की हद्दपार होणार याबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

ई-पास संदर्भात राज्यभरात संताप व्यक्त केला जात होता. कारण, अद्यापही खासगी वाहनांनी प्रवास करण्यासाठी ई-पास अनिवार्य आहे. त्यामुळे ई-पास रद्द करण्याची मागणी जनसामान्यांकडून केली जात होती. त्यासंदर्भात उद्या एक महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. या बैठकीला राज्यातील सचिव आणि गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राज्यातील ई-पास रद्द होण्याची शक्यता आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!