Google Ad
Editor Choice india

Delhi : ‘अनलॉक ४’ च्या गाईडलाईन्स जारी … काय सुरू, काय बंद?

महाराष्ट्र 14 न्यूज : केंद्राने जाहीर केलेल्या गाईडलाईन्सनुसार, येत्या 7 सप्टेंबरपासून अटी-शर्तींसह मेट्रो सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस मात्र 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. तर ओपन एअर थिएटर हे 21 सप्टेंबरपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय येत्या 21 सप्टेंबरपासून सामजिक, शैक्षणिक, राजकीय कार्यक्रमांना 100 लोकांसह परवानगी दिली आहे. कंटेनमेंट झोनच्या बाहेर लॉकडाऊन लावू नये अशी सूचनाही राज्यांना देण्यात आली आहे.

‘अनलॉक-4’मध्ये काय सुरु, काय बंद?

Google Ad

कंटेनमेंट झोनबाहेर लॉकडाऊन नाही.
कंटेनमेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन
शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार
ऑनलाइन शिक्षणासाठी शाळेत 50 टक्के शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावता येणार
21 सप्टेंबरपासून फक्त 100 लोकांच्या सहभागात सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना मंजुरी
सप्टेंबरपासून मेट्रो रेल्वे टप्प्याटप्प्याने सुरु होणार
मोकळ्या जागांवरील (ओपन एअर) थिएटर 21 सप्टेंबरपासून सुरु करता येणार
सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर्स बंदच राहणार
आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही बंदच राहणार
21 सप्टेंबरनंतर लग्न समारंभास 50 ऐवजी 100 वऱ्हाड्यांची उपस्थितीत राहता येणार
21 सप्टेंबरनंतर अंत्यसंस्कारासाठी 20 ऐवजी 100 लोकांना हजर राहता येणार

‘या’ गोष्टी बंदच राहणार :-

सिनेमा हॉल स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक
केवळ केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या विमानांना परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जनजीवन आणि देशातील आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू अनलॉकची प्रक्रिया राबवली जात आहे. आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी 1 सप्टेंबरपासून देशात अनलॉक 4 सुरु होणार आहे.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!