Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

गणेश मूर्तीचे विसर्जन कुठे करायचे? जाणून घ्या … ‘गणेश विसर्जन मूर्ती संकलन’ आपल्या दारी, पिं.चिं. मनपाची अनोखी संकल्पना!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या विघ्नाशी झुंज देत असताना विसर्जनासाठी दूर जावे लागू नये म्हणून ‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांच्या मागणी व सूचनेनुसार नुसार ‘गणेश विसर्जन मूर्ती संकलन आपल्या दारी’ हा अनोखा उपक्रम पिंपरीचिंचवड महानगरपालिके मार्फत राबवला जाणार आहे.

ज्यांना घरातील तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना गणेश मूर्तीचे विसर्जन करायचे आहे, त्यांनी आपल्या भागातील स्थानिक नगरसेवक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक ३१ मध्ये महानगरपालिकेचे हे फिरते वाहन संबंधित ठिकाणी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपा जवळ जाऊन गणेश मूर्ती स्वीकारल्या जातील. तसे आवाहन स्थानिक प्रतिनिधींकडून नागरिक आणि मंडळांना करण्यात आले आहे. तेथून पुढे मूर्ती विसर्जनाची सुविधा मनपा मार्फत केली जाणार आहे. प्रदूषणमुक्त विसर्जन आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन योग्य प्रकारे व्हावे या साठी “गणेश विसर्जन मूर्ती संकलन आपल्या दारी” ही संकल्पना राबविली जात असल्याचे, ‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांनी म्हंटले आहे.

Google Ad

प्रत्येक वॉर्ड मध्ये श्री गणेश मूर्ती संकलन केंद्र असतील . घरगुती गणेश मूर्ती या नागरिकांनी जवळच्या संकलन केंद्रात गणेश मूर्ती ठेवाव्यात, मनपाच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्रात खालील प्रमाणे व्यवस्था करणेत आली आहे.

प्रभाग क्रमांक २० :- संत तुकाराम नगर साठी भाजी मंडई

प्रभाग क्रमांक २९ पिंपळे गुरव :- १ ) रामकृष्ण मंगल कार्यालय , पिंपळे गुरव . २ ) माध्यमिक विद्यालय शाळा इमारत , बस स्टॉप समोर , पिंपळे गुरव . ३ ) बुध्द विहार , सृष्टी चौकाजवळ , पिंपळे गुरव . ४ ) स्प्रिंग बिल्डींग , डॉमिनोझ पिझ्झा खालील पार्किग , काशिद पार्क , बी.आर.टी. रोड , पिंपळे गुरव .

प्रभाग क्रमांक ३० :- ‘दापोडी’ करिता भगतसिंग शाळा,
फुगेवाडी करिता लोकमान्य टिळक शाळा
तसेच कासारवाडी करिता ‘ह’ प्रभाग कार्यालय.

प्रभाग क्रमांक ३२ :- सांगवी करिता अहिल्यादेवी
शाळा. या ठिकाणी गणेश मूर्ती संकलन करणेत येईल .

प्रभाग क्रमांक ३१ :- नवी सांगवी-पिंपळे गुरव करीता पी.डब्ल्यु. डी.मैदानावरील बॅडमिंटन हॉल, उद्याना समोरील जुनी  म.न.पा.शाळा पिंपळे गुरव, रामकृष्ण मंगल कार्यालय या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मंगल मूर्ती संकलन केले जाईल, तसेच म. न.पा.मार्फत प्रभाग ३१ नवी सांगवी- पिंपळे गुरव प्रभागात सर्व भागात चौकांमध्ये मंगल मूर्ती संकलना साठी गाडी फिरविण्यात येईल. याच बरोबर परिसरातील सार्वजनिक गणपती मंडळाच्या मंडपात मूर्ती स्वीकारन्यात येतील .

सदर व्यवस्था ५ वा. ७ वा. ९ वा.१० वा. अनंत चतुर्दशी अशा सर्व दिवशी करण्यात आलेली आहे.याची सर्व गणेश भक्तांनी सर्वांनी नोंद घ्यावी. असे प्रभाग अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!