Google Ad
Editor Choice Maharashtra crimes Pimpri Chinchwad

चिंचवड येथे भांडण सोडविणेच पडले महागात … भांडण सोडविणाऱ्या तरुणाचाच केला खून!

महाराष्ट्र 14 न्यूज : भांडणे सोडवायला गेलेल्या तरुणाचाच खून करण्यात आला . शनिवारी ( २२ ऑगस्ट ) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास चिंचवडच्या विद्यानगरमधील हनुमान मंदिरासमोर ही घटना घडली . यातील दोन आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे . विनोद ऊर्फ पप्प्या राकेश पवार ( वय २१ , रा . दत्तनगर , शेलार गल्ली , चिंचवड ) आणि अजय ऊर्फ एबी गणेश भिसे ( वय २० , रा . दत्तनगर , चिंचवड ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .

शंकर सुतार असे खून झालेल्याचे नाव आहे . नीला सुतार यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे . सुतार यांचा मुलगा शंकर व आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते . त्याचा राग आरोपींच्या मनात होता . यामुळे सुरुवातीला हा खून या वादातूनच झाल्याची चर्चा होती . मात्र , पोलिसांनी यातील दोन आरोपींना अटक केली असता सत्य समोर आले . आरोपी शंकरच्या मित्राला मारण्यासाठी आले होते . त्याला मारत असताना शंकरने मध्यस्थी केली . यामुळे चिडलेल्या आरोपींनी शंकरलाच मारल्याचे तपासात समोर आले .

Google Ad

 

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!