Google Ad
Editor Choice Pune

Pune : झेडपी विषय समित्यांच्या निवडी पुन्हा लांबणीवर

महाराष्ट्र 14 न्यूज : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या जागांवरील निवड मागील आठ महिन्यांपासून रखडली आहे . कोरोनामुळे सर्वसाधारण सभा तहकूब किंवा ऑनलाईन झाल्याने निवड लांबणीवर पडत आहे . आता जिल्हा परिषदेकडून निवड करण्याची तयारी सुरू होती . मात्र , शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घ्याव्यात , असे सांगण्यात आले . त्यामुळे आता पुन्हा एकदा विषय समित्यांच्या निवडी लांबणीवर पडल्या आहेत . व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विषय समित्यांच्या सदस्यपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवणे अशक्य आहे . उमेदवारी अर्ज भरणे , त्यानंतर अर्ज माघार आणि प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडणुकीची प्रक्रिया ही सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीतच पार पाडावी लागते .

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ती होऊ शकणार नसल्याने या निवडणुकीचा कार्यक्रम आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलावा लागणार आहे . यापूर्वी घोषित केलेली निवडणूक कोरोना आणि लॉकडाऊन मुळे रद्द करावी लागली . त्यानंतरही या निवडणुकीला मुहूर्त मिळालेला नाही . जिल्हा परिषदेतील सत्तावीस सदस्यांना सध्या विशेष समित्यांवर स्थान नाही . जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे म्हणाल्या , वार्षिक सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती . मात्र , लॉकडाऊनमुळे ती रद्द करावी लागली . तहकूब सभेमध्ये निवडणूक घेता येत नाही . दोन दिवसात निवडणुकीच्या सभेची तारीख जाहीर केली जाणार होती . परंतु आता प्रत्यक्ष सभा घेण्यावर प्रतिबंध आल्याने निवडणुकीची प्रक्रिया लांबणार आहे .

Google Ad

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!