Google Ad
Editor Choice Pune

पुणेकरांसाठी इशारा … पावसाचे पाणी वाढणार असल्याने या भागातून प्रवास करणे टाळा!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यात आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांना पाणीपुरवठा करणारी अनेक धरणं भरून वाहत आहेत. अशात खडकवासला धरणातून सायंकाळी 7 वाजतापासून मुठा नदी पात्रात 16 हजार 478 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं असून यामुळे भिडे पूल आणि नदी पात्रातील रस्ता पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे या भागातून प्रवास करणं टाळा आणि पात्रालगतच्या रहिवाशांनी अधिकची काळजी घ्यावी अशी सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, एक्सप्रेस हायवेवरही मुसळधार पावसाने दरडीही कोसळू शकतात अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे. आता फक्त पाच जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये माञ जोरदार बँटिग सुरू केली. गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात 5 जिल्हे वगळता सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.

Google Ad

त्यामुळे उजनीचा अपवाद वगळता बहुतांश धरणं 75 टक्के भरण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे.
उजनी मात्र अजूनही 30 टक्क्यांवर आहे . दरवर्षी साधारणपणे नगर, सोलापूर हे पर्जन्यछायेचे जिल्हे नेहमीच दुष्काळी राहतात. पण यावेळी नेमक्या याच जिल्ह्यात भरपूर पाऊस पडला आहे. हे यंदाच्या मान्सूनचं खास वैशिष्ठच म्हणावं लागेल. तसंच जुलै महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्याने पश्चिम महाराष्ट्रात ऑगस्टमधील मोठ्या पुराचा धोकाही काही प्रमाणात टळला आहे आणि वरून सध्याच्या पावसाने बहुतांश धरणंही भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

69 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!