Google Ad
Editor Choice Maharashtra

खासदार नवनीत राणा यांना उपचारासाठी मुंबईला हलवलं … संपूर्ण राणा कुटुंब कोरोनाच्या विळख्यात!

महाराष्ट्र 14 न्यूज : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची प्रकृती खालावली आहे . त्यामुळे त्यांच्यावर आता मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत . सध्याच्या त्यांच्यावर नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरु होते . आता त्या मुंबईला रवाना झाल्या आहेत . मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.खासदार नवनीत राणांना ६ ऑगस्टला करोनाची बाधा झाली . सुरुवातीला अमरावती येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .

मात्र , आज ( गुरुवारी ) त्यांना श्वास घेताना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . खासदार राणा या मुंबईला महामार्गाने मुंबईला जाणार आहेत . त्या प्रवासाकरिता सुमारे १२ ते १५ तासांचा कालावधी लागणार आहे. सध्या राणा कुटुंबात आमदार रवी राणा यांचे वडील , आई , बहीण , बहिणीचे पती , भाचा , पुतण्या यांच्या सह खासदार नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलगाही करोनाबाधित आहेत . त्यामुळे पूर्ण कुटुंबावर मोठे संकट आले आहे.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!