Google Ad
Editor Choice Maharashtra Pune

MAVAL: गुड न्यूज… आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरण ५८.८३ टक्के भरले!

महाराष्ट्र 14 न्यूज : गेल्या आठवड्यात मावळात पावसाने दमदार पुनरागमन केल्याने पवना धरण ५८ टक्के भरले आहे . मावळातील पवना , इंद्रायणी , सुधा , कुंडलिका या नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत . पवना , वलवण , तुंगार्ली , शिरोता , उकसान , जाधववाडी , लोणावळा , मळवंडीठुले , कासारसाई , आढले या धरणांच्या पाण्याची पातळी वाढत आहे . लोणावळ्यात २४ तासांत १५७ मिमी पावसाची नोंद झाली असून , या वर्षी आजअखेरपर्यंत केवळ २५१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे .

गत वर्षी सुमारे ४९८३ मिमी पावसाची नोंद झाली होती . पवना धरण पाणलोट क्षेत्रात दिवसभरात २५ मिमी पावसाची नोंद झाली . धरणाचा पाणीसाठा ५८.८३ टक्के इतका झाला आहे . गत वर्षी आजअखेर धरणाचा साठा ९५.८० टक्के झाला होता . यासह लोणावळ्यातील भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून पुन्हा पाणी ओसंडून वाहू लागले आहे . मावळातील नद्या , ओढे नाले ओसंडून वाहत आहेत .

Google Ad

पवन मावळातील थुगाव येथील पवना नदीवरील दोन खांब ढासळून गेले आहेत, तेव्हा तो पूल केव्हाही कोसळू शकतो. त्यामुळे पूल दुरुस्तीची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

15 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!