Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

भाजपच्या पिंपरी चिंचवड जिल्हा महिला मोर्चा च्या सांगवी-काळेवाडी मंडल अध्यक्षपदी ‘वैशाली राहुल जवळकर’ यांची निवड

महाराष्ट्र 14 न्यूज : सांगवी – काळेवाडी मंडल भाजपची नवी जम्बो कार्यकारिणी जाहीर केल्याची माहिती शहर अध्यक्ष ‘आमदार महेश लांडगे’ यांनी दिली. जनमानसात स्थान असलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन भाजपने कार्यकारणीचे गठण केल्याचे यावेळी दिसून आले.

सांगवी-काळेवाडी मंडल मध्ये चिंचवड विधानसभा मतदार संघातील सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, राहटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी या भागाचा या कार्यकारणीत समावेश असून, आगामी काळातील पक्षाची ध्येयधोरणे डोळ्यासमोर ठेवून आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या जम्बो कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.

Google Ad

आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘वैशाली राहुल जवळकर’ यांची भाजपच्या पिंपरी चिंचवड जिल्हा महिला मोर्चा च्या सांगवी काळेवाडी मंडल अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले, यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेविका उषा मुंढे, राहुल जवळकर उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!