Google Ad
Editor Choice india

अनलॉक-4 : केंद्र सरकारची नवीन नियमावली ; २१ सप्टेंबरपासून ‘ या ‘ गोष्टींना सशर्त परवानगी

महाराष्ट्र 14 न्यूज : केंद्र सरकारनेच ३० सप्टेंबरपर्यंतच्या अनलॉक ४ साठीची नवीन नियमावली जारी केली आहे. या नुसार २१ सप्टेंबरपासून सामाजिक, शैक्षणिक, खेळ, करमणूक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्ये आणि इतर मंडळांना १०० जणांच्या कमाल मर्यादेसह परवानगी देण्यात आली आहे. तसेच इयत्ता ९ ते १२ च्या विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या कंटेन्टमेंट झोन बाहेरील भागात, त्यांच्या शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्याकरता स्वयंसेवी आधारावर त्यांच्या शाळांमध्ये जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते. हे त्यांच्या आई – वडिल तसे पालकत्व स्विकारलेल्यांच्या लेखी संमतीवर अवलंबून असेल, असे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय (एमओएचयूए) तसेच रेल्वे मंत्रालय (एमओआर) व एमएचएच्या चर्चेनंतर मेट्रो रेल्वेला ७ सप्टेंबरपासून श्रेणीबद्ध पद्धतीने ऑपरेट करण्यास परवानगी केंद्र सराकरने दिली आहे. शिवाय व्यक्ती आणि वस्तूंच्या आंतरराज्यीय आणि आंतरराज्यीय हालचालींवर कोणतेही बंधन असणार नाही. अशा हालचालींसाठी स्वतंत्र परवानगी, मान्यता, ई-परवान्याची आवश्यकता भासणार नाही, असे नियम अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकारने घालून दिले आहेत.

Google Ad
Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!