Google Ad
Editor Choice Pune District

Maval : आंदोलनकर्त्याची धमकी … २ लाख रुपये द्या, उपोषण मागे घेतो … अन्यथा अॅट्रॉसिटी!

महाराष्ट्र 14 न्यूज : दोन लाख रुपये द्या, मी उपोषण मागे घेतो. अन्यथा तुमच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देणाऱ्या एका आंदोलकाविरुद्ध देहूरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात करण्यात आला आहे. अमित माणिक छाजेड असं आरोपीचं नाव आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत मेन बाजार येथे राहत्या घरांवर १७ व्यापाऱ्यांकडून अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. त्यासंदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्डानं या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी व्यापाऱ्यांना नोटीस बजावली आहे.

सदर बांधकामावर तात्काळ कारवाई करावी, यासाठी अमित माणिक छाजेड याने बंडाचा पवित्रा उगारत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विरोधात उपोषणास सुरुवात केली.
अमित माणिक छाजेड यानं आपल्या कार्यकर्त्यासोबत आंदोलन तसेच उपोषणाला सुरुवात केली. परंतु उपोषणादरम्यान व्यापाऱ्यांसोबत काही तडजोड होते का, या विचारात तो होता. छाजेड याने देहूरोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनय बरोटा यांना फोन करून १७ व्यापाऱ्यांनी मिळून मला दोन लाख रुपये द्या. मी माझे आंदोलन उपोषण स्थगित करतो. अन्यथा माझ्या आंदोलनामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डकडून होणाऱ्या अतिक्रमण कारवाईला सामोरे जा. तसेच मागणी पूर्ण झाली नाही तर व्यापाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हे दाखल करतो, अशी धमकी दिली.

Google Ad

यासंदर्भात विनय बरोटा यांनी अमित यांचे संभाषण मोबाईलवर रेकॉर्ड करून इतर व्यापाऱ्यांसोबत थेट पोलिस स्टेशन गाठलं. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अमित माणिक छाजेड याच्याविरुद्ध भादंवि कलम ३८५ अंतर्गत खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे. या संपूर्ण प्रकरणात अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून देहूरोड पोलीस घटनेचा तपास करीत आहे.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

121 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!