Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नगर येथे सर्व धार्मिक संस्था संघटनाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करत आंदोलन!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी संकट असो वा आनंद लोकांचे मंदिराच्या दिशेने पाय वळतात.. अश्या वेळी राज्यात सर्व अनलॉक करत असताना मंदिर मात्र बंद ठेवण्याचा निंदनीय निर्णय राज्य सरकारने घेतला.. भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहर अध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी पत्रव्यवहार केला, तहसील कार्यालयावर निवेदन दिले, अश्याच वेळी वारकरी संप्रदायाच्या वतीने पंढरपूरला अमरण उपोषण झाले, राज्यात ठीक ठिकाणी भजन आंदोलन करण्यात आले.

राजकीय नेत्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना थेट माहिती सुद्धा देण्यात आली पण तरीही कोणत्याही प्रकारचे सरकारने भजन-कीर्तन करण्याकरता परवानगी व मंदिर उघडण्याची परवानगी देण्याबद्दल साधी चर्चासुद्धा न केल्यामुळे सर्वच स्थरावर जणतेमध्ये तीव्र नाराजीचा सूर निर्माण झाला असल्याचे भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शिवराज सुदामराव लांडगे यांनी सांगितले. महाराष्ट्रात कुठल्या मंदिरात भजन कीर्तन करण्याकरिता लोक जमा झाले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रकार घडत आहे. महाराष्ट्रात भजन कीर्तन आणि पूजा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आसून ह्याचा आम्ही निषेद करतो, असेही ते म्हणाले …

Google Ad

वारकरी संघटना, राजकीय पक्ष जर सरकारला एवढी विनंती करतायत तरी पण राज्य सरकार ला ह्या प्रश्नांवर उत्तर देण्याकरिता दोन मिनिट सुद्धा नाहीत का हा सर्व विचार करून सरकारचे डोळे उघडण्या करिता आणि सहन करण्याची क्षमता संपल्यामुळे आम्ही आमचे मार्गदर्शक आमदार महेशदादा लांडगे ह्याच्या मार्गदर्शन खाली आज इंद्रायणी नगर येथे सर्व धार्मिक संस्था संघटना एकत्र येऊन लाक्षणीय उपोषण करीत आंदोलन करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.. कार्यक्रमाला स्थायी समिती चे माजी सभापती विलास मडीगेरी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

77 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!