Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपळे गुरव, विनायक नगर मधील दोन सख्या बहिणींचा टेम्पो-दुचाकीच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड येथे रावेत-औंध रस्त्यावर रावेत येथे बीआरटी रोडवर शनिवारी ( दि. १२ )रात्री टेम्पो आणि दुचाकी ऍक्टिवाच्या धडकेत झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत झाला. अपघातानंतर दोघींना तातडीने लोकमान्य हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शीतल गिरमे आणि सायली हेगडे असे मृत झालेल्या महिलेंची नावे असून त्या दोघीही पिंपळे गुरव मधील विनायक नगर मध्ये आपले वडील रमेश गेनबा भोपळे यांच्याकडे आल्या होत्या . रात्री पिंपळे गुरवहून दोघीही आपल्या घरी रावेत येथे ऍक्टिवा वर जात असताना रावेत मध्ये बीआरटी रस्त्यावर समोरून येणाऱ्या टेम्पोने वळण घेत असताना जोरदार धडक दिली त्यात दोघींचा जागेवरच दुर्दैवी अंत झाला. अपघातानंतर टेम्पो चालक पळून गेल्याचे समजते.

Google Ad

यामुळे पिंपळे गुरावमधील विनायक नगर येथे त्यांचे वडील रमेश भोपळे राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली असून दोघींचे मृतदेह पिंपळे गुरव येथे आणण्यात आले आहेत. रमेश भोपळे हे पिंपळे गुरव या भागातील सामाजिक कार्यकर्ते असून त्यांना दोन्हीही मुलीच होत्या, त्यातील शीतल गिरमे हिला दोन मुली असून सायली चा विवाह मागील वर्षीच झाला होता. त्या दोघीही रावेत येथे राहण्यास होत्या. त्यांच्या या आकस्मित निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!