Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

लॉकडाऊन बाबत पिंपरी चिंचवड आयुक्तांची महत्त्वाची घोषणा … नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे जिल्ह्यात तसेच पिंपरी चिंचवड शहरातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्याची अफवा शहरात पसरली . मात्र , जिल्ह्यात लॉकडाऊनबाबत कोणताही निर्णय झालेला नाही , असे जिल्हाधिकारी डॉ . राजेश देशमुख यांनी सांगितले . त्यामुळे लॉकडाऊन ही अफवाच असल्याचे स्पष्ट झाले आहे .

पिंपरी चिंचवड शहरात सोमवारपासून कोणत्याही प्रकारचा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला नसून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लाॅकडाऊनबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. तथापि सोशल मिडीयामध्ये प्रसारीत होत असलेल्या याबाबतच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याने यांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पिंपरीचिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

160 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!