Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिं.चिं.मनपाच्या थेरगाव येथील खिंवसरा पाटील रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.वृषाली कांबळे यांचे दुःखद निधन!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव येथील खिंवसरा पाटील रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) डाॅ.श्रीम.वृषाली कांबळे मॅडम (वय अंदाजे 40 वर्ष) यांचे शिर्डी येथील रूग्णालयात अल्पशा आजाराने (Non-Covid) दुःखद निधन झाले आहे. त्या कामानिमित्त शिर्डी येथे गावी गेलेल्या होत्या, तेथे त्यांना अचानक त्रास झाल्याने तेथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याचे समजते.

डॉ. वृषाली कांबळे यांना एक लहान मुलगा असून, मित्रमैत्रिणी मध्ये सतत हसतमुख, मनमिळाऊ असणाऱ्या डॉ वृषाली यांनी कोरोनाच्या काळात खिवसरा पाटील रुग्णालयात कोविड रुग्णांकरीता आपले बहुमोल असे योगदान दिले, इतरांच्या आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या वृषालीच्या असे तरुण वयात अचानक जाण्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या काळात जनतेसाठी सेवाकार्य करणाऱ्या अशा या कोविड योध्यास भावपूर्ण श्रद्धांजली!

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

76 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!