Google Ad
Editor Choice Education

बेरोजगार तरुण आणि दिव्यांग बांधवांना सर्वार्थाने स्वावलंबी बनविण्यासाठी अधिक व्यापक आणि बदलत्या काळाशी समरुप असलेल्या कौशल्य प्रशिक्षण योजना राबविण्याचा मानस – भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांची घोषणा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ डिसेंबर) : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिभा महिला प्रतिष्ठान तसेच राज्याचा कौशल्य-रोजगार-उद्योजकता-नाविन्यता विभाग, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवी येथील द न्यू मिलेनिअमय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पंडीत दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे शंकर जगताप यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन झाले.

यावेळी विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे, माजी महापौर माई ढोरे, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार, सहाय्यक आयुक्त सागर मोहिते, माजी महापौर नानी घुले, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेविका सविता खुळे, अश्विनी चिंचवडे, उषा मुंढे, आरती चोंधे, शारदा सोनवणे, निर्मला कुटे, संगीता भोंडवे, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, राजेंद्र राजापुरे, सांगर आंगोळकर, अंबरनाथ कांबळे, बाबासाहेब त्रिभुवन, शशिकांत कदम, प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, विभीषण चौधरी, संदीप गाडे, गोपाळ माळेकर, भाजप महिला आघाडी शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, भाजपचे प्रदेश सदस्य अमित गोरखे, युवकचे प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, प्रमोद ताम्हणकर, राहुल जवळकर, योगेश चिंचवडे, विनोद तापकीर, आदी उपस्थित होते.

Google Ad

यावेळी बोलताना ‘शंकर जगताप’ म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून गेले काही दिवस सातत्याने विविध राज्यांमध्ये ठिकठिकाणी रोजगार मेळावे भरवले जात आहेत. त्यातून केंद्र सरकार देशातील हजारो युवकांना रोजगार मिळवून देत आहे. बेरोजगार युवक व युवतींना रोजगाराच्या विविध संधी मिळवून देतानाच त्यांच्यामध्ये स्वयंरोजगाराची कौशल्ये विकसित करून समाज व देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे.

पंडीत दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा त्याच उद्देशाने आयोजित केले आहे. बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळवून देतानाच त्यांच्यामध्ये स्वयंरोजगाराची कौशल्ये विकसित करून समाज व राज्यास प्रगतीपथावर नेण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. स्वयंरोजगाराच्या कौशल्यातूनच व्यवसाय निर्मितीला चालना मिळणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी रविवारी (दि. ४) केले.

यावेळी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अश्विनी लक्ष्मण जगताप, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार, यांनीही बेरोजगार तरूणांना मार्गदर्शन केले.

सकाळी ०९ वाजले पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन तसेच पुणे, पिंपरी चिंचवड शहरातून अनेक तरुण तरुणी नवंउद्योजक आपल्या रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी या ठिकाणी आल्याचे दिसत होते. त्यात दिव्यांगांचा ही सहभाग दिसून आला. या महारोजगार मेळाव्यात पुण्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील ४० हून अधिक खासगी उद्योजकांनी आपला सहभाग दर्शविला.

विविध पदांसाठी आठवी, नववी, दहावी, बारावी उत्तीर्णांसह विविध शाखेतील पदवीधर, पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी पात्रता असणारे महिला-पुरुष तरुण तरुणी उमेदवार यात पात्र झाले.  या रोजगार मेळाव्यात स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करणारी महामंडळे, दिव्यांग उमेदवारांसाठी विविध योजनांची माहिती, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे स्टॉलही लावण्यात आले होते.

या रोजगार मेळाव्यात अकराशेपेक्षा जास्त जणांना “ऑन द स्पॉट” नोकरी मिळाली. भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली. तसेच या मेळाव्याच्या माध्यमातून ५१ दिव्यांगांना नोकरी उपलब्ध झाली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement