Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

यावर्षीचे गणेशविसर्जन घाटांवर करता येणार नाही … पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केले आवाहन!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणेबाबत निर्देश जारी करण्यात आलेले आहेत. तसेच नागरिकांची होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनादेखील आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

तसेच यावर्षी महानगरपालिकेमार्फत नैसर्गिक व सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात येणा-या विसर्जन घाटांवर गणेशमुर्ती विसर्जन करण्यासदेखील मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेमार्फत विसर्जन घाटांचे ठिकाणी कोणतीही सुविधा याकामी उपलब्ध करण्यात येणार नसल्याने नागरिकांनी गणेशमुर्तींचे विसर्जन घरामध्येच करावयाचे आहे.
महानगरपालिकेमार्फत विसर्जन घाटांचे परिसरामध्ये करण्यात येत असलेली साफसफाई ही आरोग्य विभागाच्या नियमित कामकाजाचा भाग असून त्याठिकाणी कोणतीही विसर्जनाची परवानगी देण्यात आलेली नाही याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी.

Google Ad

तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेमार्फत गणेशोत्सवानिमित्त करण्यात आलेल्या प्रतिबंधानुसार साधेपणाने गणेशमूर्तींचे आगमन व विसर्जन पार पाडून महानगरपालिकेस सहकार्य करावे. असे डॉ.के अनिल रॉय आरोग्य वैद्यकीय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी कळविले आहे.

 

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!