Google Ad
Editor Choice Education Pune

Pune : मनपाच्या शिक्षण विभागातील १९ शिक्षकांना निवृत्तीनंतरही दोन महिने वेतन दिल्याचं आलं समोर … शिक्षण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह!

महाराष्ट्र 14 न्यूज : हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मनपाचं आर्थिक नियोजन बिघडलं आहे. मात्र अशाही परिस्थितीत मनपा प्रशासनाचा अनागोंदी कारभार सुरूच आहे. मनपाच्या शिक्षण विभागातील १९ शिक्षकांना निवृत्तीनंतर दोन महिने वेतन दिल्याचं समोर आलं आहे. मनपाच्या स्थायी समितीमध्ये हा प्रकार समोर आला असून यात दोषींच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

दोन महिन्यांपूर्वी पुण्यातील १९ शिक्षक निवृत्त झाले होते. मात्र त्यानंतरही या शिक्षकांना जवळपास दोन महिने वेतन सुरु होते. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मनपा कोरोनावर मोठ्या प्रमाणात खर्च झाले सांगतं आहे. राज्य सरकारकडून फारशी मदत मिळाली नसल्याचा आरोप होतो आहे. माञ दुसऱ्या बाजूला निवृत्तीनंतरही पगार देण्यात आला आहे. आता या शिक्षकांना नोटीसा पाठवल्या असून काहींनी वेतन परतही केलं आहे.

Google Ad

या प्रकरणी विरोधी पक्षांनी सत्ताधारी हे फक्त टेंडरमध्ये अडकलेत. त्यांचे इतर विभागात लक्ष नसल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केला आहे. तर याबाबत चौकशीचे आदेश दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!