Google Ad
Editor Choice Maharashtra

कोरोनाच्या काळात असा करा घरीच गणेश प्राणप्रतिष्ठा स्थापना विधी!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २२ ऑगस्ट : सध्याच्या चालु परिस्थितीत ब-याच ठिकाणी गणेश चतुर्थीस गणेश प्राणप्रतिष्ठेस पुरोहित उपलब्ध होऊ शकत नाहीत त्यामुळे ब-याच भाविकांची अडचण होते.त्यासाठी *पुराणोक्त प्राणप्रतिष्ठा* लिहुन पाठवला आहे

पार्थिवगणेशपूजा प्रारंभ:-
प्रथम कपाळी तिलक धारण करून आचमन करावे देवापुढे पानसुपारीचा विडा ठेवावा देवास नमस्कार करून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि पुजेला प्रारंभ करावा.

Google Ad

पुढे दिलेल्या 3 नावांचा उच्चार करून प्रत्येक नावाच्या शेवटी संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन प्यावे.
1) *केशवाय नमः*
2) *नारायणाय नमः*
3) *माधवाय नमः*

चोथ्या नावाचा उच्चार करून संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन ते ताम्हणात सोडावे.
4) *गोविंदाय नमः*

यास आचमन असे म्हणतात
*असे दोन वेळेस करावे.*

त्यानंतर हात जोडून खालील नावे म्हणावीत

5) *विष्णवे नमः*
6) *मधुसूदनाय नमः*
7) *त्रिविक्रमाय नमः*
8) *वामनाय नमः*
9) *श्रीधराय नमः*
10) *ऋषिकेशाय नमः*
11) *पद्मनाभाय नमः*
12) *दामोदराय नमः*
13) *संकर्षणाय नमः*
14) *वासुदेवाय नमः*
15) *प्रद्युम्नाय नमः*
16) *अनिरुद्धाय नमः*
17) *पुरुषोत्तमाय नमः*
18) *अधोक्षजाय नमः*
19) *नारसिंहाय नमः*
20) *अच्युताय नमः*
21) *जनार्दनाय नमः*
22) *उपेन्द्राय नमः*
23) *हरये नमः*
24) *श्रीकृष्णाय नमः*

*यो देवः सवितास्माकं धियो धर्मा दिगोचरे|*
*प्रेरयेत्तस्य तद्भर्गः तद्वरेण्यं उपास्महे||*
असे म्हणावे.
या नंतर मनामध्ये
*नमो भगवते वासुदेवाय* असे म्हणावे.

म्हणावे
*श्रीमन्महागणपतये नम:॥*
*इष्ट देवताभ्यो नमः ||*
*कुल देवताभ्यो नमः ||*
*ग्राम देवताभ्यो नमः ||*
*वास्तु देवताभ्यो नमः ||*
*सर्वेभ्यो देवेभ्यो नम:॥*
*सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः।।*
*एतत कर्मप्रधान देवताभ्यो नमः।।*
नंतर हातात अक्षता घेऊन श्रीगणेशाचे मनात स्मरण करावे आणि खालीलप्रमाणे मंत्र म्हणावेत

*सुमुखश्च एकदंतश्च कपिलो गजकर्णकः||*
*लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः||*

*धुम्रकेतुर् गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः||*
*द्वादशैतानि नामानी यःपठेद् शृणुयादपि ||*

*विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा ||*
*संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ||*

अक्षता हातात घेऊन दोन पळ्या पाणी घेऊन खालीलप्रमाणे संकल्प म्हणावा रिकाम्या जागी आपल्या नाव गोत्राचा उच्चार करावा

*श्रीमद्भगवतो महापुरुषस्य..शालिवाहनशके शार्वरी नामसंवत्सरे, दक्षिणायने, वर्षा ऋतौ, भाद्रपद मासे, शुक्लपक्षे, चतुर्थ्यां तिथौ मंद वासरे, हस्त दिवस नक्षत्रे, कन्या स्थिते वर्तमाने चंद्रे, सिंह स्थिते श्रीसूर्ये, धनु स्थिते श्रीदेवगुरौ, शुभपुण्यतिथौ….॥*

*मम आत्मन: परमेश्वर आज्ञारुप-पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं………..गोत्रोत्पन्नः(स्वतःचे गोत्र म्हणावे) ……..नामक(स्वतःचे नाव म्हणावे) यजमानः अहं अस्माकं सकलकुटुंबानां सपरिवाराणां समस्त शुभफल प्राप्त्यर्थं प्रतिवार्षिक विहितं {पार्थिवसिद्धिविनायक} देवता प्रीत्यर्थं यथाज्ञानेन यथामिलित उपचार द्रव्यै: प्राणप्रतिष्ठापन पूर्वक ध्यानआवाहनादि षोडश उपचार पूजन अहं करिष्ये॥*

पाणी ताह्मणात सोडावे. पुन्हा पाणी हातात घेऊन खालीलप्रमाणे उच्चार करावा.
*आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणं, कलश, शंख, घंटा, दीप पूजनं च करिष्ये॥*
ताह्मणात पाणी सोडावे.नंतर श्रीगणेशाचे स्मरण करावे

*वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ।*
*निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।।*
महागणपतये नमः
सर्वोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि।।

कलश,शंख,घंटा,दिवा समई यांची पूजा करावी गंध, अक्षता, फुले,हळद कुंकू वहावे

*कलशस्थ वरूणाय नमः*
*सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि।।*
(फूल गंध-अक्षतेमध्ये बुडवून कलशाला वहावे)

शंखाय नमः
*सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि।।*
शंखाला गंधफूल वहावे

घंटिकायै नमः
*सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि।।*
(फूल गंध-अक्षतेमध्ये बुडवून घंटेला वहावे)

दीप देवताभ्यो नमः
*सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि।।*
समईला फूल गंध-अक्षतेमध्ये बुडवून वहावे

*अपवित्रःपवित्रोवा* *सर्वावस्थांगतोपिवा*
*यस्मरेत पुडरिकाक्षं*
*सबाह्याभ्यंतरःशुचिः*
कलशातील पाणी सर्व पूजा सामुग्रीवर फूलाने शिंपडावे

॥प्राणप्रतिष्ठा॥

गणपतीच्या डाव्या बाजुला (हृदयाला)आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी स्पर्श करावा व आपला डावा हात आपल्या हृदयाला स्पर्श करावा आणि पुढील मंत्र म्हणावे

*अस्यां मृन्मयमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोग:॥*
*॥ आं -हीं क्रों॥ अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं अ:॥ क्रों -हीं आं हंस: सोहं॥*
*अस्यां मूर्तौ प्राण- जीव – सर्वेंद्रियाणि वाङ् मन:त्वक् चक्षु श्रोत्र जिव्हा घ्राण पाणि पाद पायूपस्थानि इहैवागत्य सुखं चिरं तिष्ठंतु नमः॥*

*गर्भाधानादि पंचदश संस्कार सिद्ध्यर्थं पंचदश प्रणवावृती: करिष्ये॥*
आणि श्रीगणेशास स्पर्श करून मनात 15वेळा “औम” म्हणावे नंतर खालील मंत्राने श्रीगणेशाच्या नेत्रांना दूर्वाने तुप लावावे.
*अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा:क्षरंतु च।*
*अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन॥*

श्रीगणेशाचे ध्यानं करावे
*एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं।*
*पाशांकुशधरं देवं ध्यायेत्सिद्धिविनायकं॥*

श्रीगणेशाच्याडोक्यावर अक्षता वहाव्यात
*आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्वर।*
*अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक॥*
अस्मिन पार्थिव मूर्तौ महागणपति आवाहयामी।

श्रीगणेशास अक्षता वाहून सिंहासन अर्पण करत आहोत अशी कल्पना करावी
*नानारत्न समायुक्तं कार्तस्वरविभूषितम्।*
*आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्॥*
महागणपतये नमः
आसनार्थे दूर्वांकुरं समर्पयामि।

श्रीगणेशाच्या चरणांवर दुर्वा ठेवाव्या

*पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेमसमर्थ भो।*
*भक्त्या समर्पितं तुभ्यं लोकनाथ नमोस्तु ते॥*
महागणपतये नम
पाद्यं समर्पयामि।
गणपतिच्या पायाशी फुलाने पाणी शिंपडावे

*नमस्ते देव देवेश नमस्ते धरणीधर।*
*नमस्ते जगदाधार अर्घ्यं न: प्रतिगृह्यताम॥*
महागणपतये नमः
अर्घ्यं समर्पयामि।
श्रीगणेशाच्या चरणांवर गंध फुल अक्षता यांनी युक्त पाणी वहावे

*कर्पूरवासितं तोयं मंदाकिन्या:समाहृतम्।*
*आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तित:॥*
महागणपतये नमः
आचमनीयं समर्पयामि।
गणेशाच्या पायावर पाणी शिंपडावे

श्रीगणेशाच्या चरणांवर पंचामृत वहावे
महागणपतये नमः।
पंचामृत स्नानं समर्पयामि।

त्यानंतर शुद्ध पाणी शिंपडावेइ
महागणपतये नमः
शुद्धोदकं समर्पयामि।

श्रीगणेशास अक्षता वहाव्यात
*श्रीगणेशाय नमः सुप्रतिष्ठितमस्तु॥*

श्रीगणेशास वस्त्रे वहावीत
*सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जानिवारणे।*
*मयोपपादिते तुभ्यं*
*वाससी प्रतिगृह्यताम्।*

श्रीगणेशास यज्ञोपवीत वहावे
*देवदेव नमस्तेतु त्राहिमां भवसागरात्।*
*ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं गृहाण परमेश्वर॥*

श्रीगणेशास गंध लावावे
*श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरम्।*
*विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्॥*

श्रीगणेशास अक्षता वहाव्यात *अक्षतास्तंडुला:शुभ्रा:कुंकूमेन विराजिता:।*
*मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर॥*

श्रीगणेशास हळद वहावी
*हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी।*
*सर्वालंकारमुख्या हि देवि त्वं प्रतिगृह्यताम्॥*

श्रीगणेशास कुंकू वहावे *हरिद्राचूर्णसंयुक्तं कुंकुमं कामदायकम्।*
*वस्त्रालंकरणं सर्वं देवि त्वं प्रतिगृह्यताम्॥*

श्रीगणेशास शेंदूर वहावा *उदितारुणसंकाश जपाकुसुमसंनिभम्।*
*सीमंतभूषणार्थाय सिंदूरं प्रतिगृह्यताम्॥*

श्रीगणेशास गुलाल अबीर वहावे
*ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे।*
*नानापरिमलद्रव्यं गृहाण परमेश्वर॥*

श्रीगणेशास फुले,हार,कंठी,दुर्वा वहावे
*माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो।*
*मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्॥*

श्रीगणेशाच्या प्रत्येक अवयवांवर किंवा डोक्यावर अक्षता वहाव्यात
*॥अथ अंग पूजा॥*
*गणेश्वराय नम:*-पादौ पूजयामि॥(पाय)
*विघ्नराजाय नम:*-जानुनी पू०॥(गुडघे)
*आखुवाहनाय नम:*-ऊरू पू०॥(मांड्या)
*हेरंबाय नम:*-कटिं पू०॥ (कंबर)
*लंबोदराय नम:*-उदरं पू०॥ (पोट)
*गौरीसुताय नम:*-स्तनौ पू०॥(स्तन)
*गणनायकाय नम:*- हृदयं पू॥(हृदय)
*स्थूलकर्णाय नम:*-कंठं पू०॥(कंठ)
*स्कंदाग्रजाय नम:*-स्कंधौ पू०॥(खांदे)
*पाशहस्ताय नम:*-हस्तौ पू०॥(हात)
*गजवक्त्राय नम:*-वक्त्रं पू०॥(मुख)
*विघ्नहत्रे नम:*-ललाटं पू०॥(कपाळ)
*सर्वेश्वराय नम:*- शिर:पू०॥(मस्तक)
*गणाधिपाय नम:*-सर्वांगं पूजयामि॥
(सर्वांग)

श्रीगणेशास विविध पत्री अर्पण कराव्यात
अथ पत्र पूजा:-
*सुमुखायनम:*-मालतीपत्रं समर्पयामि॥
(मधुमालती)
*गणाधिपायनम:*-भृंगराजपत्रं॥
(माका)
*उमापुत्रायनम:*-बिल्वपत्रं॥(बेल)
*गजाननायनम:*-श्वेतदूर्वापत्रं॥(पांढ-यादूर्वा)
*लंबोदरायनम:*-बदरीपत्रं॥(बोर)
*हरसूनवेनम:*-धत्तूरपत्रं॥(धोत्रा)
*गजकर्णकायनम:*-तुलसीपत्रं॥(तुळस)
*वक्रतुंडायनम:*-शमीपत्रं॥(शमी)
*गुहाग्रजायनम:*-अपामार्गपत्रं॥(आघाडा)
*एकदंतायनम:*-बृहतीपत्रं॥(डोरली)
*विकटायनम:*-करवीरपत्रं॥(कण्हेरी)
*कपिलायनम:*-अर्कपत्रं॥(मांदार)
*गजदंतायनम:*-अर्जुनपत्रं॥(अर्जुनसादडा)
*विघ्नराजायनम:*-विष्णुक्रांतापत्रं॥(विष्णुक्रांत)
*बटवेनम:*-दाडिमपत्रं॥(डाळिंब)
*सुराग्रजायनम:*-देवदारुपत्रं॥(देवदार)
*भालचंद्रायनम:*-मरुपत्रं॥(पांढरा मरवा)
*हेरंबायनम:*-अश्वत्थपत्रं॥(पिंपळ)
*चतुर्भुजायनम:*-जातीपत्रं॥(जाई)
*विनायकायनम:*-केतकीपत्रं॥(केवडा)
*सर्वेश्वरायनम:*-अगस्तिपत्रं॥(अगस्ति)

श्रीगणेशास धूप,अगरबत्ती ओवाळावी
*वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधउत्तम:।*
*आघ्रेय:सर्वदेवानां धूपोयं प्रतिगृह्यताम्॥*

श्रीगणेशास दीप,निरांजन ओवाळावे
*आज्यंच वर्तिसंयुक्तं वह्निना योजितं मया।*
*दीपं गृहाण देवेश सर्वक्षेमसमर्थ भो:॥*

श्रीगणेशास नैवेद्य,प्रसाद समर्पण करावा
*शर्कराखंडखाद्यानी दधिक्षीरघृतानिच।*
*आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्॥*

श्रीगणेशास विडा अर्पण करावा
*पूगीफलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतं।*
*कर्पूरैलासमायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्॥*

श्रीगणेशाच्या समोरील विड्यावर दक्षिणा ठेवावी
*हिरण्यगर्भ गर्भस्थं हेमबीजं विभावसो:।*
*अनंतपुण्यफलद मत:शातिं प्रयच्छ मे॥*

श्रीगणेशाच्या समोरील नारळावर पळीभर पाणी सोडावे आणि त्यावर एक फुल वहावे
*इदं फलं मयादेव स्थापितं पुरतस्तव।*
*तेन मे सुफलावाप्तिर्भवेज्जन्मनि जन्मनि॥*

खालीलप्रमाणे श्रीगणेशास दोन-दोन दुर्वा वहाव्यात
दूर्वायुग्म पूजा-
*गणाधिपायनम:*-दूर्वायुग्मं समर्पयामि॥
*उमापुत्रायनम:*-दूर्वायुग्मं ०॥
*अघनाशनायनम:*-दूर्वायुग्मं ०॥
*विनायकायनम:*-दूर्वायुग्मं ०॥
*ईशपुत्रायनम:*-दूर्वायुग्मं०॥
*सर्वसिद्धिप्रदायकायनम:*-दूर्वायुग्मं ०॥
*एकदंतायनम:*-दूर्वायुग्मं ०॥
*इभवक्त्रायनम:*-दूर्वायुग्मं ०॥
*आखुवाहनायनम:*-दूर्वायुग्मं ०॥
*कुमारगुरवेनम:*-दूर्वायुग्मं ०॥

श्रीगणेशाची आरती करावी

त्यानंतर स्वतः भोवती प्रदक्षिणा करावी
*यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च।*
*तानि तानि विनश्यंति प्रदक्षिण पदे पदे॥*

श्रीगणेशास नमस्कार करावा
*नमस्ते विघ्नसंहर्त्रे नमस्ते ईप्सितप्रद।*
*नमस्ते देवदेवेश नमस्ते गणनायक॥*

श्रीगणेशाची प्रार्थना करावी
*विनायकगणेशान सर्वदेवनमस्कृत।*
*पार्वतीप्रिय विघ्नेश मम विघ्नान्निवारय।।*

एक पळीभर पाणी ताह्मणात सोडावे
*अनेन मया यथाज्ञानेन कृत पूजनेन तेन श्रीसिद्धिविनायक:प्रीयताम्॥*

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!