Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले हे आदेश … पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रात ६ ऑक्टोबर पासून लागू

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्य शासनाकडून लॉकडाऊनचा कालावधी दिनांक ३१.१०.२०२० अखेर वाढविला आहे. पिंपरी चिंचवड शहरात जनतेच्या मागण्यांसाठी तसेच मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष , सामाजिक संघटना या संबळ बजाव , मोर्चे , धरणे , निदर्शने , बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलनाचे आयोजन करतात .

तसेच दिनांक ०७.१०.२०२० रोजी वन्य पशुदिन , दिनांक ० ९ .१०.२०२० रोजी टपाल दिन , दिनांक १५.१०.२०२० रोजी जागतीक अंध सहायता दिन , दिनांक १७.१०.२०२० रोजी घटस्थापना व नवरात्र उत्सव प्रारंभ असे उत्सव व दिवस साजरे करण्यात येणार आहेत . या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये . याकरीता पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीकोनातून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया मार्फत प्रतिबंधात्मक आदेश करण्यात आले आहेत.

Google Ad

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दिनांक ०६.१०.२०२० रोजी ००.०१ वा.पासून ते दिनांक १९ .१०.०२० रोजी २४.०० वा.पर्यंत या १४ दिवसांसाठी खालील नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाईचे आदेश दिले आहेत.

अ ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ , ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे .
ब ) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे , सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने तसेच काचेचे तुकडे व काचेच्या रिकाम्या बाटल्या बरोबर नेणे , जमा करणे व तयार करणे .
क ) शस्त्रे , सोटे , भाले , चाकु , सुरा , कोयता , तलवारी , दंड , काठया , बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे .
ड ) कोणत्याही इसमाचे चित्राचे , प्रतिकात्मक प्रेताचे , पुढाऱ्यांच्या चित्राचे , प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे .

इ ) मोठ – मोठयाने अर्वाच्य घोषणा देणे , वाद्य वाजविणे . फ ) यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपुर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे , कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यावर बंदी घालीत आहे .
ग ) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन -१ ९ ५१ च्या कलम ३७ ( १ ) व ( ३ ) विरूध्द वर्तन करणे .

तसेच पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे . जमावबंदीचे आदेश हे लग्नकार्य , धार्मिकविधी , प्रेतयात्रा , सिनेमागृह इत्यादी कारणांकरीता लागू राहणार नाही . वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही . असे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!