Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : शनिवार ३ ऑक्टोबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शनिवार ( दि. ३ ऑक्टोबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील ५९८ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ८१६ रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०८ पुरुष – चिंचवड ( ४३ वर्षे , ६७ वर्षे , ५१ वर्षे ) , च – होली ( ६७ वर्षे ) , प्राधिकरण ( ३७ वर्ष ) , थेरगाव ( ५८ वर्षे ) , चिखली ( ६७ वर्षे ) , मोशी ( ५८ वर्षे ) , ०३ स्त्री-चिंचवड ( ६२ वर्षे , २५ ) , भोसरी ( ४५ वर्षे ) येथील रहिवासी आहेत.

Google Ad

पिंपरीचिंचवड बाहेरील रहिवासी परंतु पिंपरीचिंचवड रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०७ पुरुष – देहूगाव ( ६६ वर्षे , वर्ष ) , आंबेगाव ( ६२वर्षे ) , कात्रज ( ६१ वर्ष ) , अलीबाग ( ५३ वर्षे ) , कामशेत ( ७५ वर्षे ) , भिगवण ( ४२ वर्षे ) , ०४ खी- चाकण ( ६२ वर्षे ) , नांदेडगाव ( ८७ वर्षे ) , तळेगाव दाभाडे ( ५२ वर्षे ) , मगरपट्टा ( ( ५४ वर्षे ) येथील रहिवासी आहे .

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत आज अखेर १३१४ पथकांव्दारे २०६५२३८ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये १७३३ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता ३९९ व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत.

पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी जादा मास्क जवळ बाळगावा ,

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!