Google Ad
Editor Choice india

Delhi : एक सप्टेंबरपासून या गोष्टी बदलणार

महाराष्ट्र 14 न्यूज : आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीतील अखेरच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरपासून आर्थिक क्षेत्रात काही बदल होत आहेत . यात प्रमुख्याने एलपीजीचे दर , गृहकर्ज , कर्जाचे हप्ते , विमान प्रवास आदींचा समावेश आहे . या बदलांचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यात होणार आहे . विमान प्रवास- एक सप्टेंबरपासून विमान सेवा महाग होण्याची शक्यता आहे . नागरी उड्डाण मंत्रालयाने एक सप्टेंबरपासून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी उच्च विमान सुरक्षा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे . या शुल्कामुळे देशांतर्गत प्रवाशांकडून 150 ऐवजी 160 रुपये , तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून 4.85 डॉलर्सच्या ऐवजी 5.2 डॉलर्स वसूल केले जाणार आहे .

एलपीजी : घरगुती गॅस सिलेंडरचे दर कमी होण्याची दाट शक्यता आहे . एलपीजी , सीएनजी व पीएनजी दरात मोठी कपात होऊ शकते . प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलेंडरच्या किमतीत बदल होत असतात . कर्जाचे हप्ते : पुढील महिन्यापासून कर्जाचे हप्ते भरण्याचा ताण कर्जदारांना बसण्याची शक्यता आहे . कोरोना , टाळेबंदीमुळे कर्जधारकांना मार्च महिन्यापासून हप्ता न देण्याची सवलत दिली होती . ही मुदत 31 ऑगस्ट रोजी संपत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया व पंजाब नॅशनल बँक पुढील आठवड्यात याबाबत निर्णय घेणार आहेत . मेट्रो : देशात सार्वजनिक वाहतूक काही प्रमाणात सुरू आहे , परंतु अद्याप रेल्वे व मेट्रो सेवा सुरू झाली नाही . दिल्लीतील मेट्रो सेवा एक सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे . मात्र मुंबई मेट्रोसाठी प्रतीक्षा करावी लागेल .

Google Ad

जीएसटीचे व्याज : वस्तू व सेवा कर अर्थात् जीएसटीचा भरणा करण्यास विलंब झाला , तर एक सप्टेंबरपासून एकूण कर रकमेवर व्याज द्यावे लागणार आहे . कर न भरल्यास 18 टक्के इतके व्याज लागू शकते . वाहनचालकांचा संप : ओला व उबर या अॅपबेस्ड कार सेवा देणाऱ्या कंपनीचे वाहनचालक एक सप्टेंबरपासून संपावर जाण्याची शक्यता आहे . विविध मागण्यांसाठी संबंधित वाहनचालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे . शाळा सुरू होणार : केंद्र सरकारने मोकळीक -4 मध्ये 1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर या काळात शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!