Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

“सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपले आरोग्य जपावे आणि आनंदी जीवन जगावे” … महापौर उषा ऊर्फ माई ढोरे

महाराष्ट्र 14 न्यूज,दि.२८ ऑगस्ट : सेवानिवृत्त कर्मचा – यांनी आपले आरोग्य जपावे आणि आनंदी जीवन जगावे असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले . माहे एप्रिल २०२० मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा – यांचा सत्कार समारंभ आज स्थायी सभागृहात आयोजित करण्यात त्यावेळी त्या बोलत होत्या . यावेळी सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर , कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप , माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक , पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे , बाळासाहेब कापसे , योगेश रसाळ , मिलिंद काटे , योगेश वंजारे , नवनाथ शिंदे , अमित जाधव , तुषार काळभोर , निलेश घुले , गणेश भोसले उपस्थित होते .

कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनमुळे माहे एप्रिल मध्ये सत्कार समारंभ घेण्यात आलेला नव्हता तो आज पार पडला . आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त सत्कार झालेल्यांमध्ये मुख्यध्यापिका रोहिणी जोशी , उपलेखापाल राजेंद्र मेमाणे , मुख्य आरोग्य निरिक्षक जगदिश गायकवाड , मुख्य लिपिक सुनंदा तोडकर , दत्तात्रय आंत्रे , नारायण कोडितकर , विलास बाणेकर , सिस्टर इनचार्ज माणिक ढिलपे , वाहनचालक विलास थोरात , फार्मासिस्ट संजय तिवाटणे , उपशिक्षक कांता वाघमारे , सुनंदा कदम , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुरेश धरत , वायरमन दत्तात्रय भोसले , लिडिंग फायरमन शिवाजी ताकवले.

Google Ad

वायरलेस ऑपरेटर सुरेश पवार , वॉर्ड बॉय रमेश आगळे , मजुर नरेश कांबळे , शिपाई पिराजी भोसले , हनुमंता पुंडा , सफाई कामगार लताबाई मागाडे , प्लंबर मनोजकुमार कांबळे , फायरमन शंकर पाटील यांना सन्मानित करण्यात आले . तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या मुख्यध्यापिका रत्नमाला आढाव , लॅब टेक्निशियन जयश्री काळे , सफाई कामगार सुजाता पंडीत , मंगला पाटेळे , महेंद्र साकळे , कचरा कुली दाऊद मुंडे , मुरलीधर गाडे यांचा देखील करण्यात आला . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले .

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!