Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा धोका वाढतोय … दिवाळी नंतर शहरात होऊ लागली कोरोना रुग्णांत वाढ!

महाराष्ट्र 14 न्यूज : दिवाळीपूर्वी महिनाभर पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने घट झाली. मात्र दिवाळीनंतर कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा लक्षणीय वाढ सुरू झाली आहे. गेले पाच दिवस सलग कोरोना रूग्ण वाढीची ही नोंद पिंपरी चिंचवडकरांच्या चिंतेत भर टाकणारी ठरली आहे. दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येणार असे भाकित यापूर्वीच करण्यात आले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरात कोरोनामुक्तांच्या तुलनेत पॉझिटिव्हची रूग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.

या पुर्वी १०० च्या आत रुग्ण आढळून येत होते. मात्र आज शनिवारी २१ नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहरात १९२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १७३ रुग्णांना उपचारा नंतर घरी सोडण्यात आले.

Google Ad

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – साईमंदीर आळंदीरोड ( ५५ वर्षे ) , ०३ स्त्री – आकुर्डी ( ७५ ३ काळेवाडी ( ६५ वर्षे ) , पिंपरी ( ८४ वर्षे ) येथील रहिवासी आहेत . पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – तळेगाव रोड , क ( ६२ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

कोरोनाच्या विषाणूचा प्रसार व साथीबाबत जगातील स्थिती पाहिली, की कोरोना जाता जात नाही, असं दिसत आहे. आशिया पॅसिफिक क्षेत्रातील देश, युरोप, भारतासह दक्षिण आशिया, अमेरिका, लॅटीन अमेरिका व आफ्रिका असो की ऑस्ट्रेलिया कोणत्याही खंडाला कोरोनाने सोडलेले नाही. त्याचा प्रादुर्भाव वाढतच चाललाय. भारतातही दिल्ली आणि अहमदाबाद बरोबरचं मुंबईलाही कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे.

असे असताना पिंपरी चिंचवड शहरातील शाळा २३ नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तो कितपत यशस्वी होतोय हे आता येणारा काळच ठरवेल. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कसा रोखयचा याचा विचार करणे हे आता नागरिकांनी ठरविले पाहिजे. या सर्वांमुळे महानगरपालिका वैद्यकीय विभागावरील कामाचा ताण वाढत चालला असून मार्च २०२० पासून डॉक्टर , परिचारिका आणि संबंधित कर्मचाऱ्यांना सुट्टीची मिळत नसल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडू लागले आहे, याचा विचार कोण करणार ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ते आपले आठ तासांचे काम ११ ते १२ तास करत आहेत याचा महानगरपालिका प्रशासनाने आणि प्रतिनिधींनी विचार करावा, नाहीतर रुग्णांवर उपचार करणाऱ्यांचेच आरोग्य बिघडले तर रुग्णांचे कसे होणार? आणि कोरोनाला कोण हरवणार!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

98 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!