Google Ad
Editor Choice Maharashtra

Pandharpur : पंढरपूरची कार्तिकी यात्रा रद्द … उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शासकीय महापूजा!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता यंदाची पंढरपूरची कार्तिकी यात्रा रद्द करण्यात आली आहे. कार्तिकी सोहळा यंदा प्रतीकात्मक पद्धतीने साजरा होणार आहे. येत्या 26 नोव्हेंबर रोजी पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे. ता. 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून पंढरपूरसह आजूबाजूच्या 11 गावांमध्ये संचारबंदी लागू असणार आहे. या काळात वारकऱ्यांना तसेच दिंड्यांना पंढरपुरात बंदी असणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कार्तिकी यात्रा रद्द करण्यात यावी असा प्रस्ताव पंढरपूर मंदिर समितीने सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शासनाकडे पाठवण्यात आला होता.

शासनाकडून त्यालाC मान्यता मिळताच सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ही माहिती दिली. या शिवाय 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पंढरपुरातून बाहेर जाणारी आणि बाहेरून शहरात येणारी एसटीची वाहतूक देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालख्या आणि दिंड्याना यात्रा काळात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. शहर व परिसरातील सुमारे 350 मठ बंद ठेवण्यात येणार आहेत. सध्या पुणे विभागात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात निवडणूक होत असल्याने आचार संहिता लागू आहे. यामुळे कार्तिकीची शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते होणार याकडेच वारकरी आणि भाविकांचे लक्ष लागले होते.

Google Ad

दरम्यान निवडणुक आयुक्तांनी कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 26 नोव्हेंबर रोजी पहाटे अडीच वाजता विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मुख दर्शनासाठी उघडण्यात आले आहे. पदस्पर्श दर्शना ऐवजी मुख दर्शन सुरू करण्यात आले आहे. भाविकांची गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन दर्शन बुकिंग सुरू आहे. दररोज दोन हजार भाविकांना ऑनलाईन दर्शन पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात्रा काळात ऑनलाइन दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

142 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!