Google Ad
Editor Choice Maharashtra

Pune भाजपने ठरवलं तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही … चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र 14 न्यूज : शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारची मोट बांधली. सध्या ते आपल्या तालावर सरकारही चालवत आहेत. मग ज्यादिवशी पवारांना वाटेल तेव्हा त्यांनी सुप्रिया सुळे यांनाच मुख्यमंत्री करावे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. मराठा समाजातील महिला मुख्यमंत्री कोण हा आम्ही ठरवण्याचा विषय नाही. जिच्यात क्षमता आहे ती स्त्री मुख्यमंत्री व्हावी. त्यात कोणत्या एका समाजाचं असं काही नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शुक्रवारी मुंबईतील एका कार्यक्रमात कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, असे वक्तव्य केले होते. त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांना शनिवारी पुण्यात याविषयी विचारणा करण्यात आली.

Google Ad

तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी मराठा महिला मुख्यमंत्री कोण, हा आम्ही ठरवण्याचा विषय नसल्याचे स्पष्ट केले. उद्या शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करावेसे वाटले तर त्यांनी करावे. त्यात आमचा रोल काय? आम्ही सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री केले होते. त्यामुळे भाजपने कोणतीही गोष्ट करायची म्हटली तर तर वेळ लागणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास सरकारच्या कारभारावरही टीकास्त्र सोडले.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!