Google Ad
Editor Choice Pune

‘ पवारसाहेब हॅट्स ऑफ’ … पंकजा मुंडेंच्या कौतुकामुळे राजकीय वादळाची शक्यता!

महाराष्ट्र 14 न्यूज : शरद पवार यांनी कोरोना संसर्गाच्या काळात राज्यातील अनेक शहरांना भेटी देऊन तेथील उपाययोजनांची पाहणी केली आहे . पक्ष , विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे , असंही पंकजा मुंडे सांगायला विसरल्या नाहीत . पवारांच्या कामाचं कौतुक करताना पक्ष आणि विचार वेगळे असतात , असं सांगताना त्यांनी मुंडे साहेबांच्या शिकवणाची पुष्टी जोडली . ऊसतोड

कामगारांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला पंकजा मुंडे उपस्थित होत्या . यावेळी पंकजा मुंडेआणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं . तसंच बैठकीवेळी पंकजा यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं . पुण्यात पार पडलेल्याबैठकीला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित होते . तब्बल वर्षभरानंतर पंकजा आणि धनंजय आमनेसामने आले होते .

Google Ad

दोघांची वर्षभरानंतर भेट झाली . या भेटीदरम्यान काही वेळ पंकजा – धनंजय यांच्यात चर्चा झाली.तब्बल एक वर्षानंतर आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे एकत्र दिसून आले . ऊसतोड मजुरांसाठी कट्टर विरोधक भावंडांमध्ये ‘ गोडवा ‘ पाहायला मिळाला . ऊसतोड मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी दोघे बहिण – भाऊ एकत्र आले .

ऊसतोड कामगारांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते . गेल्या दोन महिन्यापासून ऊसतोड मजुरांच्या वाढीव दरवाढीचा प्रश्न गाजत होता . हा प्रश्न तूर्तास निकाली निघाला .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!