Google Ad
Editor Choice Pune

Pune : देशी बनावटीचे पिस्टल बाळगणा – या दांडेकर पुल येथील युवकास दत्तवाडी पोलीसांनी केली जेलबंद

महाराष्ट्र 14 न्यूज : दत्तवाडी पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी क्षिरसागर व राहुल ओलेकर यांना मिळालेल्या बातमीमार्फत एक आरोपी वय अंदाजे २५ वर्षे अंगात राखाडी रंगाचे जॅकेट व काळया रंगाची नाईट पॅन्ट घातलेला हा सर्व्हे नं . १३३ , विश्वकर्मा गॅरेजजवळ दांडेकर पुल सिंहगड रोड पुणे येथे थांबलेला आहे .

अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांना कळवुन त्यांचे आदेशाने दत्तवाडी पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार व तपास पथकातील स्टाफसह सदर ठिकाणी जावुन बातमीची खात्री करुन सदर ठिकाणी सापळा रचुन या आरोपीस ०९ . ४५ वा.सुमारास जागीच पकडले तेव्हा त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव स्वप्निल राजु चव्हाण वय २४ वर्षे रा .१३० , दांडेकर पुल पुणे असे सांगितले त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला देशी बनावटीचे पिस्टल व त्याचे खिश्यात एक जिवंत काडतुस ( अंदाजे किंमत ३०,२०० / – ) असे मिळुन आल्याने ते ताब्यात घेतले.

Google Ad

आरोपीविरुध्द दत्तवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदरची कारवाई पोर्णिमा गायकवाड , पोलिस उप – आयुक्त . परिमंडळ ३ पुणे शहर , पोमाजी राठोड , सहा.पो.आयुक्त सिंहगड रोड विभाग पुणे शहर मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक , देविदास घेवारे, दत्तवाडी पोलिस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार ,. सुधीर घोटकुले , कुंदन शिंदे , पोना महेश गाढवे . अमित सुर्वे , सागर सुतकर , राहुल ओलेकर , शिवाजी क्षिरसागर , शरद राऊत , अक्षयकुमार वाबळे , नवनाथ भोसले , प्रमोद भोसले यांनी केली आहे तसेच दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार सुधीर घोटकुले करत आहेत .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!