Google Ad
Editor Choice Maharashtra

पुणे विभागात अॅक्टीव रुग्ण संख्या 25 हजार 482 … पहा, इतरही जिल्ह्यात काय आहे, कोरोनाची परिस्थिती!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे विभागातील 6 लाख 10 हजार 992 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 53 हजार 51 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 25 हजार 482 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 577 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.54 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.56 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 37 हजार 868 रुग्णांपैकी 4 लाख 6 हजार 894 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 21 हजार 653 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 321 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.13 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.93 टक्के आहे.

Google Ad

सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 60 हजार 699 रुग्णांपैकी 57 हजार 120 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 714 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 865 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 54 हजार 690 रुग्णांपैकी 51 हजार 317 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 501 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 872 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 920 रुग्णांपैकी 46 हजार 830 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 321 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 769 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 874 रुग्णांपैकी 48 हजार 831 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 293 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 750 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 3 हजार 643 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 267, सातारा जिल्ह्यात 150, सोलापूर जिल्ह्यात 191, सांगली जिल्ह्यात 20 तर कोल्हापूर जिल्ह्यात 15 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 2 हजार 5 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 830, सातारा जिल्हयामध्ये 16, सोलापूर जिल्हयामध्ये 53, सांगली जिल्हयामध्ये 31 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 75 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 43 लाख 38 हजार 736 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 53 हजार 51 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!