Google Ad
Editor Choice Pune

Pune : पाच वर्षापूर्वी खून करुन पसार झालेल्या व रेल्वे पोलीसांना वारंवार गुंगारा देणा – या आरोपीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे लोहमार्ग पोलीस स्टेशन गुरनं १२५/२०१५ भादविक ३०२,३४ प्रमाणे दाखल गुन्हया तील मुख्य आरोपी सादिक इम्तीयाज मारुफ वय -२८ वर्ष रा.बोपोडी पुणे याने त्याचे साथीदार शुभम अनिल भिसे व उमेश धमेंद्र झा यांचेसह मिळून इम्तियाज बाबू खान रा.लुंबिनी बुध्द विहाराजवळ बोपोडी पुणे यांचा दि .१२ मे २०१५ रोजी बोपोडी रेल्वे गेट येथे रेल्वेच्या लोखंडी स्लीपरने व वीट सिमेंटच्या दगडाने डोक्यात मारहाण करुन खून केला होता.

सदर गुन्हा केल्यापासून आरोपी सादिक इम्तीयाज मारुफ हा पोलीसांना मागिल पाच वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देत होता व तो स्वतःचे अस्तित्व लपवून ठिकाणे बदलुन रहात होता . युनिट ०४ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस हवालदार नागेश कुवर यांना वरील गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी हा खडकी रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली.त्याप्रमाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार युनिट -०४ , गुन्हे शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक संदिप जमदाडे , पोउपनि शिंदे , माने व पोलीस अंमलदार नागेश कुवर , यशवंत खंदारे यांनी खडकी रेल्वे स्टेशन पुणे येथे सापळा रचला.

Google Ad

पाच वर्षापासून खूनाच्या गुन्हयात पाहिजे असलेला मुख्य आरोपी सादिक इम्तीयाज मारुफ वय -२८ वर्ष रा.बोपोडी पुणे यास पकडून त्यास गुन्हयाचे पुढील कार्यवाही करता पुणे लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे . सदरची कारवाई मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री अशोक मोराळे , मा पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री बच्चन सिंह , सहा पोलीस आयुक्त गुन्हे -२ श्री लक्ष्मण बोराटे , पोलीस निरीक्षक श्री रजनिश निर्मल यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक संदिप जमदाडे , पोउपनि शिंदे , माने व पोलीस अंमलदार नागेश कुवर , यशवंत खंदारे यांनी केली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

68 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!