Google Ad
Editor Choice Maharashtra crimes Pune

Pune : चतुःशृंगी पो.स्टे . परिसरात दहशत पसरविणा-या … या अट्टल गुन्हेगारावर पुणे शहर पोलिस आयुक्तांनी केली स्थानबध्दतेची कारवाई!

महाराष्ट्र 14 न्यूज : चतुःशृंगी पोलिस स्टे . हद्दीत राहणारा गुन्हेगार गौरव संभाजी काकडे वय -२८ वर्ष रा.सोमेश्वरवाडी विठ्ठल मंदिरा शेजारी पाषाण पुणे . हा अभिलेखावरील सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार आहे . त्याने त्याचे साथीदारांसह चतुःशृंगी पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोयता , तलवार , लाकडी दांडके या सारख्या जीवघेणी हत्यारे बाळगुन खुनाचा प्रयत्न , जबरी दुखापत , बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत .

मागील ०२ वर्षामध्ये . त्याचेविरूध्द ०४ गुन्हे दाखल आहेत . त्याचेविरूध्द प्रतिबंधक कारवाई करण्यात येवून सुध्दा त्याचे गुन्हेगारी कृत्यांवर काहीएक परिणाम होत नसलेचे दिसून आले होते . त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परीसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती . तसेच त्याच्यापासून जिवीताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते . वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री.अनिल शेवाळे , नेमणूक चतुःशृंगी पो . स्टे . पुणे शहर . यांनी एमपीडीए कायदयान्वये काकडे यास स्थानबध्द करण्याकामी प्रस्ताव तयार केला.

Google Ad

पोलीस आयुक्त , पुणे शहर यांचेकडे सादर केला होता. अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन नमुद इसमाचे विरुध्द दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी एमपीडीए कायदयान्वये एक वर्षाकरीता स्थानबध्दचे आदेश पारीत केले असून त्यास दि .२७ / ०१ / २०२१ रोजी सदर आदेशानुसार स्थानबध्द करुन येरवडा कारागृह , पुणे . येथे ठेवण्यात आले आहे .

पोलीस आयुक्त , पुणे शहर यांनी सक्रिय व दहशत निर्माण करणा – या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे . त्यानुसार मागील वर्षामध्ये ११ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द केले असून चालु वर्षात सराईत गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करुन अशा प्रकारच्या अट्टल गुन्हेगारांवर या प्रमाणे कारवाई करण्याचे ठरवीले आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!