Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सुपेरवाइझरने दिली व्हाट्सअप्पवरून आत्महत्येची धमकी … गुन्हा दाखल!

महाराष्ट्र 14 न्यूज : पैशासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. सुरक्षारक्षकांच्या पगारातून पैसे कापून घेतल्याची चौकशी सुरू असलेल्या सुपरवायझरने चक्क कंपनीच्या मालकाला आपण आत्महत्या करीत असल्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे . त्याने स्वतःचा व्हिडिओ आणि लिहिलेल्या चिठ्ठीचा फोटो मालकाच्या व्हॉट्सअॅपवर पाठवला . याबाबत सुपरवायझरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली .

वैभव रंगनाथ साठे ( वय ३२ , रा . गणेशनगर , बोपखेल ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे . या प्रकरणी इंद्रजित महावीर चौगुले ( वय ३८ , रा . मासुळकर कॉलनी , पिंपरी ) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , वैभव चौगुले यांच्या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत आहे .

Google Ad

लॉकडाउनच्या काळात कंपनीत काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या पगाराचे पैसे चौगुले यांनी त्याच्याकडे दिले होते . ते त्याने स्वतःकडेच ठेवले . याबाबत सुरक्षारक्षकांनी चौगुले यांच्याकडे तक्रार केली . त्याची चौकशी सुरू आहे . दरम्यान , बुधवारी मध्यरात्री वैभवने व्हॉट्सअॅपवरून आत्महत्येबाबत धमकी दिली .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!