Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

‘सेवा सप्ताह’ अंतर्गत महात्मा गांधी जयंती निमित्ताने भाजपच्या वतीने प्रभाग क्र. ३१ नवी सांगवी-पिंपळे गुरव मध्ये स्वच्छता अभियान व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार!

महाराष्ट्र 14 न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महात्मा गांधी जयंती’ व ‘लाल बहादूर शास्त्री जयंती’ च्या निमित्ताने आज शहरात या सप्ताहाच्या अंतर्गत पर्यावरण संवर्धनाबरोबरच प्लॅस्टिक मुक्ततेचा संदेश, स्वच्छता अभियान, गरीब गरजूंना मदत आदी कार्यक्रम राबविण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून संपन्न करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी घेतला आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरामध्येही विविध सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करून समाज घटकांपर्यत पोहचण्याचा निर्णय भाजपाच्या वतीने ‘आमदार लक्ष्मण जगताप’ आणि शहराध्यक्ष ‘आमदार महेश लांडगे’ यांनी घेतला, त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Google Ad

आज २ ऑक्टोबर गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी-पिंपळे गुरव येथील काशीविश्वेश्वर चौकात ‘नगरसेविका माधवी राजापुरे’ यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले, तसेच कोरोनाच्या संकट काळात आपले आरोग्य धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यातआला.

तसेच काटेपुरम चौक येथे ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे आणि साई चौक येथे नगरसेविका सीमा चौगुले यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या ‘सेवा सप्ताह’ च्या कार्यक्रमास स्थायीसमितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, भाजपचे प्रभाग ३१ चे अध्यक्ष मारुती कवडे, सांगवी-काळेवाडी मंडल भाजपचे उपाध्यक्ष डॉ.देवीदास शेलार, सुरेश तात्याबा शिंदे, अतुल पवार, श्रीकांत पवार, चिटणीस भाऊसाहेब जाधव, शामराव धस, राजू सोनवणे, बाजीराव मागाडे बूथ प्रमुख, युवा उपाध्यक्ष प्रणव ढोरे, साई कोंढरे, अभिजीत बागुल तसेच सामाजिक कार्यकर्ते सुभाष पवार, शिवाजी घोडके, शिवाजी पोवार, ज्ञानदेव गोरे, रशीद पठाण, उद्धव डवरी-आरोग्य निरीक्षक, दशरथ बांबळे-आरोग्य सहाय्यक, आरोग्य मुकादम विकास कांबळे, कविता गोहेर तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!